दौंडचा भावी आमदार कोण ? अजित पवारांचा विश्वासू शिलेदार साथ सोडणार ? चर्चेला उधाण 

पक्षाला फायदा होणाऱ्या नेत्यांना पुन्हा पक्षात घेण्यात समस्या नाही ; सरसकट घरवापसी नाही ; नुकसान करणाऱ्यांना दारे बंदच 

दौंड,( हरिभाऊ बळी ) ता.१८ आगामी काळात दौंड विधानसभा तिकीट महायुतीकडून भाजपला गेले तरी मी इथं निवडणूक लढणार आहे असं ठाम मत अजित पवार समर्थक रमेश थोरात यांनी केल्यानं चर्चांना उधाण आले आहे. रमेश थोरात हे दौंड मधील अजित पवारांचे विश्वासू शिलेदार म्हणून ओळखले जातात. गेल्या विधानसभेला रमेश थोरात हे राष्ट्रवादीकडून विधानसभेच्या रिंगणात उतरले. त्यावेळी भाजपचे राहुल कुल यांच्याकडून त्यांना पराभव सहन करावा लागला. माञ, आता येत्या निवडणुकीत पुन्हा उभं राहणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. त्यामुळे आघाडीचा आत्मविश्वास वाढला आहे. दुसरीकडे अंदाजपत्रक अनेक लोकप्रिय घोषणा करुन विधानसभेला यश मिळवण्यासाठी महायुतीने जोरदार मार्केटिंग सुरू केले आहे. कालपरवा एकमेकांविरोधात उभे ठाकलेले महायुतीत सामावून या निवडणुकीच्या निमित्ताने गळ्यात गळे घालून फिरले माञ तेच विधानसभा निवडणुकीत एकमेकांविरोधात दंड थोपटून उभे ठाकले तर चित्र काय राहील ? याकडे दौंड तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. दौंड विधानसभा निहाय आढावा घेतला तर दौंड मतदारसंघात विधानसभेचे गणित कुणाचे फिस्कटणार यापेक्षा आजी व माजी आमदारांची वर्चस्वाचीच काय अस्तित्वाची लढाई अटळ ठरते का हा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे.

राहुल कुल हे सुनेत्रा पवार यांना दौंडमधून मताधिक्य मिळवून देतील अशी राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षा होती. माञ, ती फोल ठरली आहे. राहुल कुल आणि माजी आमदार रमेश थोरात यांच्यात मागील विधानसभा निवडणुकीत काॅंटे की टक्कर झाली होती. त्यात कुलांनी अवघ्या ७४६ मतांनी निवडणूक जिंकली होती. हे दोन्ही नेते अजितदादांसोबत होते. मात्र या दोघांनीही सुनेत्रा पवार यांच्यासाठी ताकद लावली नसल्याची चर्चा आहे. एकमेकांचे कट्टर विरोधक कुल – थोरात हे दोघे एकाच व्यासपीठावर आले खरे, माञ दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांचे शेवटपर्यंत मनोमिलन झाले नसल्याचे दिसून आले.

आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षातर्फे आप्पासाहेब पवार, नामदेव ताकवणे, वंदना मोहिते यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू ठेवली आहे. माञ विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत येणाऱ्या उपऱ्यांना संधी नको असा सूर दौंड मध्ये महाविकास आघाडी मध्ये आहे. लोकसभेला चांगले दिवस असताना विधानसभेला देखील यश निश्चित असल्याचा दावा दौंड मधून कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या कार्यकर्त्यांना या विधानसभेत बळ द्यावे. अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. केवळ निवडूकीपुरते संपर्क ठेवून जवळीक साधणाऱ्यांना संधी नं देता प्रामाणिक कार्यकर्त्यांना संधी द्यावी अशी मागणी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. दौंड विधानसभा मतदारसंघात फुटीर राष्ट्रवादी काँग्रेसला जागा मिळाल्यास दौंड मतदारसंघातील राजकारणाच्या समुद्रात पुन्हा नवं वादळ येणार असल्याची चाहूल लागली आहे.

” पक्षाला फायदा होणाऱ्या नेत्यांना पुन्हा पक्षात घेण्यात समस्या नाही” — पक्षाला फायदा होणाऱ्या नेत्यांना पुन्हा पक्षात घेण्यात कोणतीही समस्या नसल्याचे काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या या विधानामुळे अजित पवारांसोबत गेलेल्या नेत्यांसाठी पवारांचे दरवाजे सताड उघडे असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे दौंड विधानसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू सहकारी माजी आमदार रमेश थोरात दादांची सात सोडणार का ? या वादळामुळे पुन्हा एकदा दौंडच्या राजकारणात वादळ येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.”

आ. राहुल कुल यांच्या विरोधात दौंड विधानसभेला तोडीसतोड देणारा प्रबळ नेता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात नसल्याने रमेश थोरात यांच्या येण्याने पक्षाला फायदाच होईल. आम्ही त्यांचे स्वागत करु. थोरात यांचा विचार न केल्यास आमच्या सारख्या प्रमाणीक कार्यकर्त्यांचा विचार व्हावा— वंदना मोहिते, अध्यक्ष डॉ. सेल बारामती लोकसभा मतदार संघ शरद पवार.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें