वडगाव – मांडवगण फराटा जिल्हा परिषद गटात भाजपकडून गाव भेट दौरा; कार्यकत्यांनी दर्शविला शंभर टक्के पाठींबा

लोणीकंद; ता.१६ आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीकडून शिरूर विधानसभा निवडणूक प्रमुख प्रदीप विद्याधर कंद, व भाजप शिरूर तालुका अध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांनी शिरूर मतदार संघातील वडगाव – मांडवगण फराटा जिल्हा परिषद गटात गाव भेट दौऱ्याच्या दरम्यान भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या समवेत बैठक घेऊन चर्चा केली.

अवघ्या काही महिन्यांमध्येच महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होणार आहे.या निवडणुकीसाठी पुन्हा एकदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असाच मुकाबला असणार आहे. त्यासाठी भाजपनेही शिरूर मतदार संघात कंबर कसली असून शिरूर मतदार संघातील वडगाव – मांडवगण फराटा जिल्हा परिषद गटातील नागरगाव, वडगाव रासाई, सादलगाव, मांडवगण, बाभुळसर बु, गणेगाव दुमाला, तांदळी, पिंपळसूटी, शिरसगाव काटा, निर्वी या गावांना प्रदीपदादा कंद, आबासाहेब सोनवणे यांनी भेट देऊन तेथील भाजपचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला त्यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी प्रदीपदादा कंद यांना शंभर टक्के पाठींबा दर्शविला असून सरकारच्या वैयक्तीक लाभाच्या योजनेचा सर्वांना फायदा झाल्याचे सांगितले त्यामुळे त्याचे मदतानातून ऋण फेडण्याचे वचन दिले, तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक पवार यांना तुम्हीच शह देऊ शकता यासाठी आम्ही तुम्हाला ताकत देऊ असे यावेळी उपस्थित आजी माजी प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी प्रदीपदादा कंद यांना चर्चे दरम्यान सांगितले.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें