शिरूर तालुक्यातील केंदूर येथे आधार कार्ड नोंदणी अभियान आयोजित करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने पुणे जिल्हा सरचिटणीस अमीत सोनवणे तसेच किसान मोर्चा कोषाध्यक्ष गणेश साकोरे यांनी पुणे, उपजिल्हाधिकारी पल्लवी घाटगे यांना लेखी निवेदन देऊन मागणी केली आहे.
केंदूर येथे अनेक नागरिक काही तांत्रिक व वैयक्तिक कारणांमुळे नवीन आधार कार्ड काढण्यापासून वंचित राहिले आहेत त्यामध्ये अपंग मानसिक आजारी वृद्ध असे नागरिक आहेत सर्व शासकीय कामांसाठी व विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड अनिवार्य असल्याने नागरिकांना नवीन आधारकार्ड काढून मिळावे, तसेच शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागले आहे या नागरीकांच्या समस्यांची दखल घेऊन शासन स्तरावर केंदूर येथे आधार कार्ड नोंदणी अभियान आयोजित करावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय पुणे, येथे उपजिल्हाधिकारी पल्लवी घाटगे यांना भाजपाच्या वतीने सरचिटणीस अमीत सोनवणे व कोषाध्यक्ष गणेश साकोरे यांनी लेखी निवेदन देऊन मागणी केली आहे.