दि. ०६ अंथुर्णे , इंदापुर, पुणे, ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित, कृषी व्यवसाय व्यस्थापन महाविद्यालय,बारामती येथील विद्यार्थी रावे उपक्रमांतर्गत विविध उपक्रम घेत आहेत, त्याचाच एक भाग म्हणुन कृषीदुतांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये उपस्थित राहुन “शेतकरी राजा चे चित्र” या विषयावर आधारित चित्रकला स्पर्धा शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली व शालेय साहित्य बक्षिस स्वरुपात विद्यार्थ्यांना देऊन त्यांचे कौतुक केले.
कृषिदूत मयुर आडके, कृष्णा आव्हाळे, आदिनाथ घुले, शुभम कोंडे(देशमुख), शुभम नवले, क्रिष्णा रिकामे, सिद्धेश भोर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले.सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक प्रा.वाघ सर व प्रा.लोंढे सर होते.
या कृषिदुतांना ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट चे चेअरमन श्री.राजेद्रदादा पवार ,मुख्य कार्यकारी अधीकारी डॅा.निलेश नलावडे,महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा.जया तिवारी, कार्यक्रम समन्वयक प्रा.निलकंठ जंजिरे ,तसेच डॅा.मयुर पिसाळ, डॉ.पल्लवी देवकाते, प्रा.अभिषेक गाढवे, प्रा.रेश्मा शिंदे, प्रा.शिवानी देसाई यांचे मार्गदर्शन लाभले आहे.