ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी; लोणीकंद येथून म्हसोबा महाराज प्रासादिक दिंडीचे आळंदीकडे प्रस्थान

लोणीकंद (ता.हवेली) शनिवार दि. २९ रोजी “ज्ञानोबा माऊली तुकाराम” च्या जयघोषात श्रीम्हसोबा महाराज प्रासादिक दिंडीचे श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी म्हसोबा महाराज मंदिर, लोणीकंद येथून श्रीक्षेत्र आळंदीकडे प्रस्थान झाले, यावेळी शेकडो वारकरी दिंडीमध्ये सहभागी झाले होते यामध्ये युवक व महिलांची संख्या लक्षणीय होती हातात भगवे ध्वज व डोक्यावरती तुळशी वृंदावन घेतलेल्या आळंदी फाटा येथे दिंडीचे रूप पाहण्यासारखे होते.

सालाबादप्रमाणे याही वर्षी गावातील म्हसोबा मंदिर येथून तुळशीचे पूजन करत दिंडीचे प्रस्थान करण्यात आले, यंदाच्या वर्षी श्रीक्षेत्र आळंदी ते पंढरपूर पायी दिंडीसाठी म्हसोबा महाराज प्रासादिक दिंडीचे संस्थापक निवृती बाबुराव कंद, अध्यक्ष बाळासाहेब बाबुराव कंद, दिंडी चालक विनायक महाराज कांचन, मा. जि. प. सदस्या सुरेखा कंद, कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा. उपसभापती रविंद्र कंद, मा.सरपंच श्रीकांत कंद उपसरपंच राहूल शिंदे, माजी सरपंच लक्ष्मीबाई नारायण कंद, संतोष झुरुंगे, योगेश झुरुंगे, जय कंद, यांच्यासह सुखकर्ता महिला भजनी मंडळाच्या सर्व महिला तसेच लोणीकंद गावांमधून बहुसंख्य वारकरी या दिंडीमध्ये सहभागी झाले आहेत.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें