जिनिअस स्कुल मध्ये बक्षिस वितरण समारंभ संपन्न 

प्रतिनिधी : लोणीकंद

वाघोली ता. हवेली जि. पुणे येथील मराठवाडा- पुणे एज्यु. सोसायटी संचलित जिनिअस स्कूल शाळेअंतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्याचा बक्षिस वितरण समारंभ २३ डिसेंबर २०२३ रोजी मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला .

सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा.संदिप भोंडवे कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ, मा.मारूती सातव कुस्ती आंतरराष्ट्रीय पंच, मा. दिनेश गुंड सर शिवछत्रपती पुरस्कार विजेते, मा. राजेंद्र पायगुडे पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन सदस्य व क्रिडा शिक्षक, मा.गजानन कुलकर्णी रिटायर्ड मेजर, मा.शेखर यादव राज्य कुस्ती पंच यांच्यासह कुस्ती,कबड्डी क्षेत्रात राज्यस्तरीय व नॅशनल विजेती मात्तब्बर मंडळी खुप मोठ्या प्रमाणात पालकवर्ग व जणसमुदाय आदि मान्यवर उपस्थित होते.

सर्व मान्यवर क्रिडा क्षेत्रातील नामवंत क्रिडापट्टू असल्यामुळे प्रत्येकाने आपले अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडले पालकांनी विद्यार्थ्यांना लहानपणा पासूनच मैदानी खेळाची सवय लावावी. आजची पिढी ही मोबाईलवर खेळण्यापेक्षा मैदानी खेळ खेळावेत व प्रत्येक स्पर्धेमध्ये भाग घ्यावा, खेळात भाग घेतल्यामुळे शरीरही निरोगी राहते व्यायाम होतो, मुलांना वेळेवर भुक लागते, विद्यार्थ्यांना व पालकांना खेळाचे महत्व पटवून देत अशा प्रकारे मार्गदर्शन मान्यवरांनी केले व विजेत्या विद्यार्थ्याना बक्षीस म्हणून ट्रॉफी, मेडल व प्रमाणपत्र देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले .

या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष संभाजी चौधरी,सचिव भारत गोरे, उपाध्यक्षा सौ. कौशल्या चाटे, कार्याध्यक्ष बाळासाहेब दाते, संचालक सुनिल अंधारे, मुख्याध्यापिका-श्रीमती सुवर्णा धुमाळ, शिक्षक महेंद्र बांबळे, ब्रह्मदेव घुले,मल्लिकार्जुन डिग्गे, शिक्षीका-सौ. रोहिणी गायकवाड, सौ. जयश्री पाटील, सौ. महादेवी चाटे, सौ. पूजा नखाते सेविका यांच्या सह शिक्षकवृंद या सर्वांनी नियोजन केले होते .

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें