बाभुळसर बुद्रुक ग्रामस्थांकडून तालुकाध्यक्ष रवींद्र काळे यांचा सन्मान

प्रतिनिधी : अल्लाउद्दीन अलवी

बाभुळसर बुद्रुक ( ता. शिरूर ) : येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मा. रवींद्र काळे यांची पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सरपंच दिपाली नागवडे यांच्या हस्ते नागरी सन्मान करून शुभेच्छा दिल्या .

हा सन्मान निपक्ष व सर्वपक्षीय गावच्या वतीने करण्यात आला. प्रास्ताविक महेंद्र रणदिवे यांनी केले तसेच सरपंच दिपाली नागवडे यांनी केलेल्या विकास कामांचा लेखा जोखा महेंद्र रणदिवे यांनी थोडक्यात विशद केला गावामधील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटकरण करण्यासाठी व बाभुळसर म्हसोबावाडी ,जगतापवाडी या रस्त्यांसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री नामदार अजित दादा पवार यांच्या माध्यमातून दोन्ही रस्ते मुख्यमंत्री सडक योजना मध्ये बसून गावाचे वैभव टाकण्यासाठी विनंती केली .

यावेळी रामभाऊ नागवडे मा चेअरमन यांनी गेली ७५ वर्षापासून फक्त एकदाच डांबरीकरण झाल्याचे यावेळी सांगितले आणि गावाला जोडणारे तिन्ही रस्ते अत्यंत खराब आणि कच्चे स्वरूपाची असल्याची यावेळी खंत व्यक्त केली .तसेच रवींद्र काळे यांनी बोलताना शिरूर तालुक्यातील या टोकाच्या गावाच्या रस्त्याची ही दुर्रावस्ता,तसेच भीमा नदीवरील बंधारा व गणेगाव बाभुळसर गणेशवाडी मार्गे होणाऱ्या रस्त्याची मंजूर वर्क ऑर्डर तातडीने घेण्यात येईल .

यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्याची संपर्क साधला असता मंत्रालय पातळीवरील काम माननीय अजित दादा पवार यांच्याकडे शिष्टमंडळ घेऊन या रस्त्याबद्दल प्रभावी न्याय देण्याचे काम करील असे या ठिकाणी आश्वासन दिले व अजित दादाच्या माध्यमातून परिसरातील सर्व जनतेची कामे केली जाईल .तसेच घोडगंगा सहकारी साखर कारखाना चालू करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येईल असे यावेळी सांगितले.

याप्रसंगी प्रमुख उपस्थित सरपंच दिपाली नागवडे, हनुमंत पाटोळे उपाध्यक्ष परिक्रमा शैक्षणिक संकुल काष्टी, उपसरपंच सुनील देशवंत ,मा सरपंच गणेश मचाले,अंकुश नागवडे अध्यक्ष स्थानिक स्कुल कमिटी आप्पासाहेब पवार माध्यमिक विद्यालय,शामराव नागवडे मा सरपंच,हरिदास ढमढेरे मा चेअरमन संत तुकाराम वि का,महेंद्र नागवडे मा उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती जिल्हा परिषद,सुनील  दादा नागवडे चेअरमन संत तुकाराम वि का ,रामभाऊ आप्पा नागवडे मा चेअरमन बाभुळसर वि का ,निलेश कोंडे चेअरमन गणेगाव वि का, मनोहर मचाले संचालक संत तुकाराम वि का, कैलास फराटे संचालक मांडवगण फराटा वि का, प्रमोद गरुड संचालक गणेगाव वि का,संतोष बाळासाहेब फराटे इनामदार उद्योजक वाघेश्वर लॉन्स मांडवगण फराटा, नितीन फराटे उपाध्यक्ष पुणे जिल्हा सोशल मीडिया,हरिभाऊ नागवडे प्रवक्ते रयत क्रांती संघटना पुणे जिल्हा, अंकुश मचाले संचालक बाभुळसर बु वि का,भाऊसाहेब थोरात मा चेअरमन बाभुळसर वि का, विलास नागवडे संचालक बाभुळसर बु वि का,शरद नागवडे संचालक संत तुकाराम वि का, निरंजन नागवडे सदस्य ग्रा पं, मनिषा नागवडे सदस्या ग्रा पं, मंगल भंडलकर सदस्या ग्रा पं,मोहिनी रणदिवे ग्रा पं सदस्या,सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय नागवडे मुंबईकर,रामराव पाटील नागवडे,सतिश नागवडे अध्यक्ष सोशल मीडिया राष्ट्रवादी शिरूर तालुका,रोहिदास मचाले,सोमनाथ नागवडे,संदीप नागवडे, मारुती नागवडे,मोहन नागवडे, विठठ्ल नागवडे,बन्सी मचाले, प्रशांत नागवडे, अशोक नागवडे, भाऊसाहेब नागवडे, अक्षय नागवडे, अक्षय साळुंखे,संतोष भंडलकर शिपाई, शहाजी शिरोळे व बद्रीनाथ भोसले यांच्यासह आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अल्लाउद्दीन अलवी यांनी केले व सर्व उपस्थितांचे अमित नागवडे यांनी आभार मानले.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें