प्रतिनिधी : बापूसाहेब काळे
निमगाव म्हाळुंगी (ता शिरूर ) : येथे दि २७/१०/२०२३ रोजी ग्रामपंचायती माध्यमातून व के. ई. एम रुग्णालय आणि कर्वे समाज सेवा संस्था पुणे, भाजपा मन कि बात उत्तर पुणे जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने निमगाव म्हाळुंगी येथे बालकांचा सर्वांगीण विकासाची गरज , महत्त्व तसेच विकासात येणारे अडथळे व त्यावर उपाय यावर नुकतीच एकदिवसीय कार्यशाळा गावच्या जि. प. प्राथमिक शाळेमध्ये संपन्न झाली.
कर्वे समाज सेवा संस्थेचे प्रा चेतन दिवाण, के ई एम रुग्णालयाच्या वैद्यकीय सामजिक कार्यकर्त्या रिचा मुळे,निमगाव म्हाळुंगी येथील ग्रामपंचायत सदस्य तथा भाजपा मन कि बात पुणे जिल्हा संयोजक बापूसाहेब काळे व प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनी कु. पुजा आण्णासो तावरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आयोजीत करण्यात आलेल्या या कार्यशाळेत वर्तन समस्या व पालकत्व अभ्यासातील अडथळे, त्यांची कारणे व उपाय, हालचालींमध्ये मध्ये येणाऱ्या समस्या लेखन समस्या , वाचा -भाषा दोष व उपचार, श्रवण दोष व उपचार या विविध विषयांवर के. ई. एम रुग्णालयाच्या समाजसेवा विभागाच्या वैद्यकीय सामजिक कार्यकर्त्या रिचा मुळे व राहेल गायकवाड, फिजिओथरपिस्ट डॉ. भारती पाटील, मानसोपचार तज्ञ माधवी देशपांडे व अमृता भालेराव, स्पीच थेरपिस्ट कृतिका गजने आणि कल्याणी साळवी यांनी उपस्थीत पालक व नागरिकांना शास्त्रीय दृष्टिकोनातून सखोल मार्गदर्शन केले .
या कार्यशाळेसाठी कर्वे समाज सेवा संस्थेचे प्राध्यापक चेतन दिवाण, निमगाव म्हाळुंगी चे ग्रा. प.सदस्य तथा भाजपा मन कि बात उत्तर पुणे जिल्हा संयोजक बापूसाहेब काळे, जि.प. शाळेचे मुख्याध्यपक मारुती निकम, शिक्षिका रुबीना इनामदार, अंजूम इनामदार शाळेचे शिक्षक अविनाश चव्हाण सर, पांडे सर आणि गावडे सर यांचे बहुमूल्य असे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रम प्रसंगी श्री म्हसोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार काळुराम चव्हाण,शिवराज्य प्रतिष्ठाण चे सचिव वामनराव गव्हाणे, शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा अश्विनी सूर्यवंशी, बाजीराव चौधरी, शिवाजी नागवडे, राजाराम चव्हाण, ग्रामपंचायत कर्मचारी प्रदीप करपे यांच्यासह आदी ग्रामस्थ उपस्थित होते .
या कार्यशाळेची प्रस्तावना ग्रामपंचायत सदस्य तथा भाजपा मन कि बात उत्तर पुणे जिल्हा संयोजक बापूसाहेब काळे यांनी केली. तसेच सूत्रसंचालन कु पुजा आण्णासो तावरे यांनी केली तर आभार मुख्याध्यापक मारुती निकम यांनी मानले .