मराठा आरक्षण आंदोलन पाठिंबासाठी बाभूळसर बु येथील सरपंच सौ.दिपाली नागवडे यांचा राजीनामा

 

प्रतिनिधी:अल्लाउद्दीन अलवी बाभुळसर बु 

ता२७.आज बाभुळसर बु ता शिरूर जि पुणे येथे सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज बाभूळसर बु!! येथे सकल मराठा समाजाच्या वतीने युवक व ग्रामस्थ यांनी ग्रामसेवक/सरपंच यांना निवेदन दिले.

यावेळी गावच्या सरपंच सौ.दिपाली महेंद्र नागवडे यांनी आपल्या सरपंचपदाचा राजीनामा ग्रामसेवक श्री.गायकवाड भाऊसाहेब यांच्याकडे सुपूर्द केला.यावेळी सरपंच दिपाली नागवडे यांनी मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुळे मुलांना शैक्षणिक व नोकरी मिळवण्यासाठी पात्रता असूनही संधी मिळत नाही.तसेच ज्या घटकांना आरक्षण आहे त्यांना अगदी कमी टक्केवारी मध्ये ऍडमिशन मिळत आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मी सरपंचपदाचा राजीनामा ग्रामसेवक गायकवाड भाऊसाहेब यांच्याकडे देत आहे. तसेच सरकारने लवकर मराठा समाजाला आरक्षण देऊन समाजाची होणारी शैक्षणिक व नोकरीमध्ये होणारी अव्हेलना थांबविली पाहीजे असे सरपंच दिपाली महेंद्र नागवडे यांनी सांगितले .

यावेळी मा सरपंच गणेश मचाले,उपसरपंच सुनील देशवंत  परिक्रमा शैक्षणिक संकुलचे संचालक हनुमंत भाऊ पाटोळे,तंटामुक्ती समिती अध्यक्ष अरुण संपत नागवडे,संत तुकाराम सोसायटीचे चेअरमन सुनील तुकाराम नागवडे, पतसंस्थेचे मा.चेअरमन दिलीप स. नागवडे, सोसायटीचे मा.चेअरमन हरिदास ढमढेरे, भिमाघोड ऍग्रो कंपनीचे अध्यक्ष संतोष नागवडे, ग्रामपंचायत सदस्य निरंजन नागवडे, ग्रामपंचायत सदस्या प्रीती प्रशांत नागवडे, सदस्या मोहिनी महेंद्र रणदिवे,सोसायटीचे संचालक विलास गवळी,संत तुकाराम सोसायटीचे संचालक मनोज मचाले,शाळा व्यवस्थापन समिती मा.उपाध्यक्ष महेंद्र नागवडे, सोशल मीडिया अध्यक्ष सतीश नागवडे, सुहानी दूध डेअरी चे चेअरमन प्रशांत नागवडे,महादेव नागवडे, विठ्ठल नागवडे,ज्ञानेश्वर नागवडे, डॉ.दादा भगत,सचिन जाधव,महेश नागवडे,अक्षय नागवडे, आकाश नागवडे, अनिकेत शितोळे,पंकज नागवडे, सागर नागवडे,सुमित नागवडे आदी उपस्थित होते.तसेच आंदोलन काळात आत्महत्या केलेल्या आंदोलकांना सामुहिक श्रध्दांजली वाहून सर्व आंदोलकांना तंटामुक्ती समिती अध्यक्ष अरुणदादा नागवडे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अल्लाउद्दीन अलवी व आभार संतोष नागवडे यांनी मानले.

 

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें