कोंढवा भागातील विविध समस्याबाबत उपमुंख्यमंत्रीअजितदादा पवार यांना निवेदन

 

हडपसर दि २५(प्रतिनिधी संदिप डोके)

 

कोंढवा खुर्द प्रभाग क्रमांक २७ मिठानगरमधील खराब झालेले रस्ते,ड्रेनेज लाईन,शिवनेरी नगर डी.पी.रोड,निधीअभावी रखडलेले सिव्हिक कल्चरल आणि कम्युनिटी सेंटर,अनेक प्रकल्पे अशा विविध समस्याबाबत उपमुख्यमंञी तथा पुणे जिल्हाचे पालकमंत्री अजित पवार यांना नगरसेवक गफुर पठाण यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

महापालिकेत सद्या प्रशासकराज असल्याने प्रशासनामार्फत प्रभागाला जाणुनबुजुन दुर्लक्ष केले जात आहे.वार्डस्तरीय निधीदेखील पुरेसा उपलब्ध नसल्याने कोंढव्यात अनेक समस्यांनी तोंड वर काढले असुन या सर्वांचा त्रास सामान्य नागरिकांना भोगावा लागत आहे असे नगरसेवक गफुर पठाण यांनी निवेदनामार्फत पालकमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत पोहचवले. राज्य शासन व महानगरपालिकेकडुन या सर्व समस्या मार्गी लावण्यासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करुन देईल असे आश्वासन उपमुख्यमंञी अजितदादा पवार यांनी दिले.

कोंढव्यातील समस्याबाबत उपमुंख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देताना नगरसेवक गफुर पठाण(छाया:संदिप डोके हडपसर)

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें