आमदार रोहीत दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली ” युवा संघर्ष पदयात्रेला” शौर्यपीठ तुळापुर येथून प्रारंभ

 

प्रतिनिधी हवेली 

तुळापूर (तालुका हवेली): दि.२५.१०.२०२३ रोजी “युवा संघर्ष पदयात्रा” आमदार रोहीत दादा पवार यांनी जन समुदायाच्या उपस्थितीत ऐतिहासिक पुण्यभूमी,पवित्र तिर्थक्षेत्र तुळापूर येथून श्री छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळाचे दर्शन घेऊन सकाळी ६.०० वाजता “पदयात्रेस” प्रारंभ केला.

 

या पदयात्रेचे देवदत्त निकम पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष यांच्या नियोजनात सुरु असून यावेळी शिरूर हवेली चे विद्यमान आमदर अशोक पवार , आर.आर. पाटील यांचे चिरंजीव रोहीत पाटील, पुणे जि.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक अध्यक्ष स्वप्निल भैय्या गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिरूर तालुका अध्यक्ष विश्वास काका ढमढेरे व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पंडित दरेकर  प्रविण गायकवाड संभाजी ब्रिगेड मराठा महासंघ, संदीप गोते हवेली तालुका अध्यक्ष, भारती शेवाळे महिला जिल्हा अध्यक्ष, सुरेखा भोरडे हवेली महिला अध्यक्ष, प्रदिप वसंत कंद महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस, श्रीमंत झुरुंगे मा उपसरपंच लोणीकंद, तुळापूर गावच्या सरपंच गुंफा इंगळे, मा. सरपंच गणेश पुजारी, मा.उपसरपंच संतोष शिवले, राजाराम शिवले, , रुपेश शिवले, मा. चेअरमन शांताराम शिवले मा. व्हाईस चेअरमन, हनुमंत शिवले संचालक, किसन पुजारी कार्यकारी अधिकारी, विजय वाळुंज राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष पुणे जिल्हा, शिरुर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष तुषार दसगुडे, सतीष थिटे, सचिन भोंडवे, नवनाथ पवळे, प्रफुल्ल शिवले,सरपंच, कांतीलाल वागस्कर, नवनाथ वागस्कर, विकास शिंदे, शामराव खलसे,सोमनाथ कंद, यांच्यासह तूळापूर ,फुलगाव, लोणीकंद, वढू बुद्रुक, वढू खुर्द या परिसरातील अनेक पदाधिकारी, बहुसंख्य नागरीक, ग्रामस्थ उपस्थित होते.

 

युवकांचे प्रेरणास्थान आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली “युवा संघर्ष” यात्रेची सुरुवात श्री क्षेत्र तुळापूर श्री छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळावरून  २५ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ६.०० वाजता प्रारंभ झाला ही यात्रा ४३ दिवसात पुणे ते नागपूर ८०० किलोमीटर पायी प्रवासाची असणार आहे दररोज यात्रा सहा वाजता प्रारंभ झाला असून यात्रेचा पहिला टप्पा १० ते ११ किलोमीटरचा असेल त्यानंतर दुपारी १२ ते ४ या वेळेत भोजन व थोडी विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा प्रवास सुरू राहील. दररोज ही यात्रा १८ ते २० किलोमीटर अंतर चालणार आहे. ही यात्रा चालताना मार्ग सोडून इतर वळविण्याचा आग्रह नागरिकांनी करू नये ही पदयात्रा पक्ष विरहीत असून कुठल्याही पक्षाचे चिन्हं नाही या संघर्ष यात्रेत महिला, भगिनी, तरुणांनी व नागरिकांनी, ग्रामस्थांनी सहभाग घ्यावा असे आवाहन शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी केले आहे .

 

 

 

 

 

 

 

 

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें