शिंदवणे येथे श्री मल्हार मल्टी सर्विसेस महा-ई-सेवा केंद्र व नागरी सुविधा केंद्राचे उद्घाटन 

 

प्रतिनिधी लोणीकंद

शिंदवणे (ता हवेली) : बुधवार दि.२५ ऑक्टोंबर २०२३ रोजी श्री.मल्हार मल्टी सर्विसेस महा-ई-सेवा केंद्र व नागरी सुविधा केंद्राचे उद्घाटन पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप विद्याधर कंद यांच्या हस्ते करण्यात आले.

 

या नागरी सुविधा केंद्राच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांना सातबारा उतारा ,जन्म- मृत्यू प्रमाणपत्र, रहिवासी व जातीचे प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, रेशन कार्ड, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, केंद्र व राज्य सरकारच्या वैयक्तिक लाभाच्या योजना अशा प्रकारच्या सेवा या नागरी सुविधा केंद्राच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत, महा-ई-सेवा केंद्र व नागरी सुविधा केंद्र ही सरकार व लोकांच्या मधील दुवा म्हणून त्यांची भूमिका महत्वाची आहे असे पीडीसीसी बँकेचे विद्यमान संचालक प्रदीप विद्याधर कंद यांनी बोलताना सांगितले .

यावेळी पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सुदर्शन चौधरी, सरपंच ज्योतीताई महाडिक अजिंक्य कांचन, हवेली तालुका सहकार आघाडी अध्यक्ष गुरुनाथ मचाले, गणेश महाडिक, सचिन मचाले,आनंद शितोळे, प्रमिलाताई शितोळे, जगदीश महाडिक , संदीप चौधरी, पंडित महाडिक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें