भारतीय जनता पार्टीमध्ये सामाजिक कार्यकर्ते किशोर लोंढे व त्यांच्या सहकाऱ्यांचा जाहीर प्रवेश

 

 

प्रतिनिधी : लोणीकंद
वाघोली ( ता. हवेली) : येथील सामाजिक कार्यकर्ते किशोर लोंढे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुणे जिल्हा परीषदचे माजी अध्यक्ष प्रदीपदादा कंद यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला.

यावेळी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष गणेश कुटे, लोणीकंदचे उपसरपंच राहुल शिंदे, पुणे जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष संदीप आबा सातव,लोणीकंद ग्रामपंचायत सदस्य गौरव झुरुंगे,मोहन शिंदे यांच्यासह आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी भारतीय जनता पार्टी मध्ये त्यांचे स्वागत केले . भारतीय जनता पार्टी हा पक्ष जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असून भारतीय जनता पार्टी राजकारणात काम करत असताना गरीब,पीडीत, शोषित,वंचित ,घटकांना न्याय देण्याची भूमिका असते त्यामुळे आपल्या सारख्या सामाजिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी भारतीय जनता पार्टी हा एकमेव पर्याय आहे, म्हणूनच येणाऱ्या काळात आपण सर्व मिळून जनतेच्या प्रश्न सोडवण्यासाठी,विकासासाठी काम करूया अशा भावना सामाजिक कार्यकर्ते किशोर लोंढे यांनी “शिरूर हवेली न्यूज” शी बोलताना व्यक्त केल्या.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें