पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समिती बाभुळसर बु. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड बिनविरोध

 

 

प्रतिनिधी: अल्लाउद्दीन अलवी 

बाभुळसर बु (ता.शिरूर) दि. १३.पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाभुळसर बु ता शिरूर जि पुणे येथील शाळा व्यवस्थापन समिती (२०२३ ते २०२५) या दोन वर्षे कालावधी साठी नवनिर्वाचित अध्यक्ष पदाची निवड सरपंच दिपाली महेंद्र नागवडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी अध्यक्ष पदी संतोष नारायण नागवडे यांची व उपाध्यक्षपदी मा. किशोर विलास नागवडे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल खंडू कोकाटे सर व सुभाष ओंकार धनी सर ,केंद्रप्रमुख भरत बजरंग काळे सर हे निवडणूक अधिकारी म्हणून शासन नियमानुसार व्यवस्थापन समिती प्रक्रिया पार पडली.

 

 

यावेळी संत तुकाराम विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेचे मा.चेअरमन मा हरिदास बबनराव ढमढेरे ,मा.महेंद्र तात्या नागवडे मा. उपाध्यक्ष व विद्यमान सदस्य शाळा व्यवस्थापन समिती, मनोज संभाजी मचाले संचालक संत तुकाराम वि का सोसायटी,जयवंत तात्या नागवडे सरचिटणीस राष्ट्रवादी शिरूर ,सतीश नागवडे अध्यक्ष सोशल मीडिया राष्ट्रवादी शिरूर, ग्रामपंचायत सदस्या प्रिती प्रशांत नागवडे,विघ्नहर्ता दुध संकलन चेअरमन शामराव मोहन ढमढेरे, नितीन आप्पा नागवडे युवा नेतृत्व रविराज शिवाजी नागवडे युवा ,विलास गवळी बाभुळसर वि का, प्रशांत नागवडे चेअरमन संकलन, निलेश नागवडे युवा, अजित गवळी युवा, महादेव नागवडे सामाजिक कार्यकर्ते,शरद नामदेव नागवडे,संतोष कैलास नागवडे अनिता सचिन जाधव डॉक्टर दादा भगत किरण राऊत नवनाथ नागवडे सामाजिक कार्यकर्ते, बाळासाहेब रामभाऊ नागवडे ,संदीप नारायण नागवडे युवा,संजय शरद नागवडे ,जाकीर सय्यद, किशोर पंडित नागवडे, वर्षा सुरेश कांबळे, सोनाली जयदीप नागवडे,राहुल नागवडे, किशोर जाधव यांच्यासह आदी ग्रामस्थ उपस्थित होते .

 

तसेच यावेळी मा उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन महेंद्र तात्या नागवडे यांनी नवनिर्वाचित सदस्यांना उपाध्यक्षपदी संधी मिळावी असे भावना व्यक्त करुन सर्व नवनिर्वाचित सदस्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.तसेच विष्णू मोहन चौधरीसर, गोरख धुळाजी कोथिंबीरेसर आणि प्रतिभा शोभाचंद मस्के मॅडम सर्व शिक्षकवृंदांनी या कामी सहकार्य केले व उपस्थितांचे गोरख धुळाजी कोथिंबीरेसर यांनी आभार मानले.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें