प्रतिनिधी लोणीकंद
वाघोली (ता.हवेली): मंगळवार दिनांक १०/१०/२०२३ रोजी (१३/४० वा) केसनंद रोड, वाघोली, पुणे, बालाजी पार्क,या राहते घरी सौ.कोमल अजय चव्हाण या विवाहितेने गळफास घेवुन आत्महत्या केली.
याबाबत कोमलचे वडील नंदु शिर्के, (वय- ४८ वर्ष), रा.बालाजी पार्क, केसनंद रोड, वाघोली, पुणे यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी पती अजय दामोदर चव्हाण (रा. कुटेवस्ती, लोणीकंद-बकोरी रस्ता) याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुद्ध पो.स्टे. गु.र.नं. ८१७/२०२३, भा.द.वि.क ३०६ कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील फिर्यादी यांची मुलगी सौ. कोमल हिस तीचे लग्नांनतर सहा महीन्यापासुन ते आज रोजी पर्यंत पती अजय कोमलच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिस वारवार मारहाण करून, तीचा शारिरीक व मानसिक छळ करीत होता.शेवटी पतीच्या त्रासाला व कंटाळून कोमल हिने राहते घरी गळफास घेवुन आत्महत्या केली. पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक, निखिल पवार हे करीत आहेत.