अकोला लोकसभा मतदारसंघात भव्य आरोग्य शिबीर व ग्रामीण रूग्णालयाचे भूमिपूजन

 

लोणीकंद/ पुणे: प्रतिनिधी

अकोला जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रूग्णालय येथे दोन दिवसीय महाआरोग्य शिबिराचा शुभारंभ, सुपर स्पेशालिटी रूग्णालयाच्या नूतन इमारतीचे तसेच शिवापूर येथील उपजिल्हा रूग्णालयाचे भूमिपूजन व बोरगाव मंजू येथील ग्रामीण रूग्णालयाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते व अकोल्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्य महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

 

यावेळी अभ्यागत समितीचे अध्यक्ष तथा आमदार रणधीर सावरकर, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरिश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमोल मिटकरी , जि. प. अध्यक्ष संगीता अढाऊ, माजी आमदार डॉ. रणजीत पाटील, विभागीय आयुक्त डॉ. निधी पांडेय, जिल्हाधिकारी अजित कुंभार, वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांच्यासह आदी उपस्थित होते.

अकोला हे मेडिकल हब होताना सर्वसामान्यांना परवडणा-या उपचार सुविधा उपलब्ध होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील. त्यासाठी सर्व शासकीय वैद्यकीय संस्थांचे बळकटीकरण करण्यात येईल. आरोग्य क्षेत्राचे महत्व ओळखून राज्यात विविध सुविधा व सेवा निर्माण करण्यात आल्या आहेत, असे या कार्यक्रमादरम्यान उपस्थितांशी अकोल्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्य महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संवाद साधताना स्पष्ट केले.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें