प्रतिनिधी अल्लाउद्दीन अलवी
बाभुळसर बु (ता.शिरूर) : शनिवार दिनांक ७. “पद्मश्री आप्पासाहेब पवार” माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. जालिंदर दादासाहेब पवार यांना अहमदनगर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. तसेच कु अजित शरद पवार यांस रशिया येथे होणाऱ्या स्केटिंग स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल विद्यालयाच्या व गावच्या वतीने सन्मान करण्यात आला.
यावेळी परिक्रमा संकुलचे व्हा चेअरमन मा. हनुमंत हनुमंतभाऊ पाटोळे, मा. अंकुश मोतीराम नागवडे अध्यक्ष स्थानिक स्कुल कमिटी , मनोहर संभाजी मचाले उपाध्यक्ष स्थानिक स्कुल कमिटी, सचिन बापू मचाले अध्यक्ष, पुणे जिल्हा भाजपा किसान मोर्चा, उपसरपंच सुनील देशवंत, राजकुमार हांडे मा सदस्य ग्रा पं गणेगाव दुमाला, नानासाहेब नागवडे चेअरमन श्री दत्त ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था, दिलीप बापू नागवडे मा चेअरमन श्री दत्त पतसंस्था, रमेश दादा पाटोळे मा संचालक संत तुकाराम वि का सोसायटी, अमोल नागवडे संचालक संत तुकाराम वि का,सुनील नागवडे, महादेव नागवडे, निता शरद पवार, चैताली पाटोळे मॅडम,खामकर सर, दादासाहेब घुटेसर डाकेसर ,हनुमंत देशवंतसर, महेंद्र रणदिवेसर ,गदादे मॅडम ,बाळासाहेब राऊत, हरिदास क्षीरसागर, शामराव सूळ यांच्यासह सर्व कर्मचारी शिक्षकवृंद, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादासाहेब घुटेसर यांनी व खामकरसर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.