प्रतिनिधी लोणीकंद
पुणे : वडकी नाला येथील शोरुमच्या स्टॉक यार्डमधून मारुती सुझुकी बलेनो चारचाकी चोरी करणाऱ्या आरोपीला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक दोनने अटक केली आहे.आरोपीकडून लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा उघडकीस आला असून 10 लाख 68 हजार रुपये किमतीची बलेनो कार जप्त केली आहे.
यश दत्तात्रय कामठे (वय 20 रा. हनुमान मंदिरा शेजारी, बेंदवाडी फुरसुंगी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक दोनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी हडपसर परिसरात पेट्रोलींग करत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार दत्तात्रय खरपुडे व उदय काळभोर यांना चारचाकी वाहन चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी साने गुरुजी हॉस्पिटल जवळ क्लासमेट कॅफे समोर येणार असल्याची माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार पथकाने सापळा रचून आरोपी यश कामठे याला ताब्यात घेतले.
त्याच्याकडे असलेल्या मारुती सुझुकी बलेनो चारचाकी बाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिला.
पोलिसांनी त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता बलेनो कार सहा-सात दिवसांपूर्वी ऑटो विस्टा मारुती सुझुकी शोरूम दहावा मैल वडकी नाला पुणे येथील शोरूमच्या स्टॉक यार्ड मधून विक्रीकरिता चोरी केल्याचे सांगितले. याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस आणून 10 लाख 68 हजार रुपयांची चारचाकी गाडी जप्त केली आहे. पुढील तपासासाठी आरोपीला लोणी काळभोर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे
पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विवेक पाडवी पोलीस अंमलदार उदय काळभोर, दत्तात्रय खरपुडे, अशोक आटोळे, विनायक रामाने, अमोल सरतापे यांच्या पथकाने सदरची कारवाई केली.