प्रतिनिधी/ लोणीकंद
शिरूर तालुक्यातील लोणीकंद येथे रविवार दिनांक २ रोजी जिल्हा कुस्तीगीर संघाची बैठक पै संदीप भोंडवे यांच्या अध्यक्षतेखाली होऊन महत्त्वपूर्ण निर्णय घेतले.
यावेळी या बैठकीस पै. दिनेश गुंड व पै. मारुती चौधरी (खेड), माऊली ताकवणे (दौंड), मारकड (इंदापूर), सादीक मारुती अक्कार व भाऊसाहेब पडळकर (बारामती),राजेंद्र जगताप व बाळासाहेब कोलते (पुरंदर), मोहन खोपडे (भोर),शिवाजी तांगडे व पै. पांडुरंग खानेकर (मुळशी), पै. खंडु वाळंज (मावळ), विलास कदम (जुन्नर), पै. राजेंद्र पावळे (आंबेगाव), पै. झेंडू पवार (शिरूर), पै. मेघराज कटके, पै. नवनाथ घुले (हवेली), राष्ट्रीय कुस्तीगीर संध्या पानबुडे, राष्ट्रीय पंच पै. मारुती सातव,श्रावण चोरमले, सागर भोंडवे, जुबेर शेख, श्रीकांत जांभूळकर यांच्यासह पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाच्या संलग्न १३ तालुक्यातील प्रतिनिधी व पैलवान मंडळी उपस्थित होते.
या बैठकीत पुणे जिल्हा वरिष्ठ गादी/माती अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत या वर्षी तालुकास्तरीय निवड चाचणी न घेता पुणे जिल्हा खुली निवड चाचणी १५ ऑक्टोबर नंतर होणार आहे असून स्पर्धेचे स्थळ ठरल्यानंतर जाहीर केले जाईल तसेच तालुकास्तरीय पंचाचे रजिस्ट्रेशन तालुक्याच्या शिफारसीनुसार त्या पंचाचे जिल्हा कुस्तीगीर संघाला रजिस्ट्रेशन केले जाणार आहे. असे महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे बैठकीचे अध्यक्ष संदीप भोंडवे यांनी “शिरूर हवेली न्यूज” शी बोलताना सांगितले.