प्रतिनिधी लोणीकंद
पुणे: दिनांक ०१ ऑक्टोबर २०२३ राष्ट्रपिता “महात्मा गांधी” यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली म्हणून स्वच्छता पंधरवडा – स्वच्छता ही सेवा (SHS)२०२३ अंतर्गत देशभरात स्वच्छता मेगा ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले होते.
त्यानिमित्त कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार आणि कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांचे संयुक्त विद्यमाने कृषी उत्पन्न बाजार समिती पुणेचे श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड, गुलटेकडी, पुणे ४११०३७ येथील मुख्य बाजार आवारातील फळे भाजीपाला विभाग, फुलांचा बाजार, गुळ भुसार विभाग, तसेच मांजरी, मोशी, खडकी, पिंपरी येथील उपबाजारामध्ये स्वच्छतेसाठी श्रमदान करण्यात आले.
यावेळी मुख्य बाजार व उपबाजार आवार येथे बाजार समितीचे सभापती – मा. श्री. दिलीप काळभोर, उपसभापती – मा. रविंद्र कंद, सचिव – मा. डॉ. राजाराम धोंडकर, संचालक – मा. गणेश घुले, मा. अनिरूध्द भोसले, मा. सुदर्शन चौधरी, मा. संतोष नांगरे, मा. अच्युत गोरख सुरवसे, वरिष्ठ विपणन अधिकारी, पुणे, कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार, बाजार समितीचे सहसचिव मा. शिवाजी गायकवाड, सहाय्यक सचिव मा. बाळासाहेब तळेकर यांच्यासह संबंधित अधिकारी, कर्मचारी वर्ग तसेच गुळ भुसार विभाग, फुलांचा बाजार, व फळे भाजीपाला बाजार आवारातील आडते, व्यापारी, शेतकरी, हमाल, तोलणार, कामगार व विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार सर्व उपस्थितांनी स. १०.०० ते ११.०० या वेळेत श्रमदान करून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली अर्पण केली.