पुणे पिंपरी-चिंचवड येथे होणाऱ्या महासंमेलनाच्या आयोजन अध्यक्ष पदी समाजसेवक संतोष बारणे यांची निवड तर कारगील हिरो महावीरचक्र विजेता श्री.”दिगेन्द्र कुमार” यांची प्रमुख उपस्थिती 

 

प्रतिनिधी लोणीकंद 

पुणे : पिंपरी-चिंचवड येथे रविवार दिनांक ०८ ऑक्टोंबर, २०२३ रोजी राष्ट्रनिर्माणाची अतुल्य दूरदृष्टी जोपासणारे ‘१५ वे अखिल भारतीय कर्तव्यम् प्रेरणा महासंमेलन या वर्षीचे आयोजन,महाराष्ट्रातील विद्येचे माहेरघर व सांस्कृतिक नगरी पुणे येथील आचार्य अत्रे रंगमंदिर,येथे करण्यात आले आहे आजपर्यंत झालेल्या विविध संमेलनांना उत्तराखंड राज्याचे विद्यमान राज्यपाल लेफ्टनंट जनरल श्री.गुरमीत सिंग यांची ‘संमेलनाध्यक्ष’ म्हणून उपस्थिती लाभली आहे. त्यांच्याच प्रेरणेतून संतोषभाऊ बारणे यांची निवड करण्यात आली आहे.

या संमेलनासामध्ये प्रामुख्याने भारतीय सेनेतील राजपूताना रेजिमेंटचे कारगील हिरो महावीरचक्र विजेता श्री. दिगेन्द्र कुमार यांची या महासंमेलनाला विशेष उपस्थिती लाभणार आहे.

 

या संमेलनामध्ये प्रामुख्याने कर्तव्यम् सोशल फाऊंडेशन, राष्ट्रीय सैनिक संस्था व श्री. शंभूराज्याभिषेक ट्रस्ट, पुणे यांच्या सन्मवयातून राष्ट्रीय कर्तव्याची प्रेरणा दृढ व्हावी याकरीता देशातील विविधांगी प्रतिभेच्या सन्मानादाखल राष्ट्रधर्माकरीता तत्पर राहणा-या कार्यवीरांचा गौरव म्हणून या महासंमेलनाचे हे अभूतपूर्व आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी विविध पुस्तकांचे प्रकाशन व राज्यपाल श्री. गुरमीत सिंग यांच्या दोन वर्षाच्या कार्यकाळावर आधारीत ‘कॉफी टेबल बुक’ चे प्रकाशन देखील करण्यात येणार आहे.

कारगील युध्दामध्ये आपल्या अतुलनीय शौर्याने पाकीस्तानी सेनेचा पराभव करणारे व भारतीय विजयाचा तिरंगा कारगील मध्ये फडकविणारे श्री. दिगेन्द्र कुमार यांच्या शौर्याचे रोमहर्षक अनुभव याप्रसंगी ‘कारगील की कहाणी, महावीर की जुबानी’ या कार्यक्रमातून व्यक्त केल्या जाणार आहे. याशिवाय भारतीय सेनेतील व विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींचा यात सहभाग राहणार आहे.भारत देशाच्या वैभवशाली संस्कृतीला उजाळा देणा-या व आशिया खंडातील देशांच्या सांस्कृतिक आदान-प्रदानतेच्या विचाराला बळकट करणा-या अखिल भारतीय कर्तव्यम् प्रेरणा संमेलनाची लक्षणीय परंपरा आहे. या संमेलनामध्ये भारत देशातील विविध क्षेत्रातील क्रियाशील शिक्षक, युवक, महिला, सैनिक,जेष्ठ नागरिक व बालकांचा सहभाग होणार आहे. देशातील प्रत्येकच सहभागी व्यक्ती मधील सुप्त गुणवत्तेला व प्रतिभेला गौरविल्या जाण्याची ही सुखद संधी आहे. उत्तम गुणवत्ता जोपासून, व्यसनमुक्ती,आरोग्य, शिक्षण, क्रीडा विकास, कला प्रशिक्षण, सामाजिक सुरक्षा, राष्ट्रीय कर्तव्य, संस्कार व मूल्यशिक्षण या दृष्टीने विविध स्तरांवर सततच क्रियाशील राहून आपल्या ‘भारत’ देशाविषयी आपली निष्ठा अन्बांधिलकी सिध्द करणा-या निवडक कार्यशील व्यक्तींना याप्रसंगी गौरविल्या जाणार आहे.

SANYO DIGITAL CAMERA

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें