श्री स्वामी समर्थ सहकारी बँकेच्या सभासदांना गतवर्षी १२ टक्के लाभांश


लोणीकंद प्रतिनिधी : निघोजे,ता.पारनेर जि. अहमदनगर येथील दि.१७/०९/२०२३ रोजी श्री स्वामी समर्थ सहकारी बँकेची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेचे अध्यक्ष अँड अशोक भिकाजी शेळके यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणामध्ये नुकतीच संपन्न झाली.

यावेळी अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ, व्यवस्थापक मंडळ, सभासद , कर्मचारी वृंद आदींसह सर्व उपस्थितांच्या वतीने दिवंगत झालेले जागतिक व भारतीय कीर्तीचे राज धुरंदर, ज्ञात- अज्ञात थोर नेते, कलावंत ,जवान, शिक्षणतज्ञ, संशोधक, शास्त्रज्ञ, साहित्यिक, राजकीय, सामाजिक, व सहकारी कार्यकर्ते, देशभक्त, कवी, लेखक, खेळाडू बँकेचे सभासद, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.अध्यक्ष यांनी आपले मनोगत व्यक्त केले, व बँकेच्या वैशिष्ट्या बाबत व सोयी सुविधांबाबत सांगितले.श्री स्वामी समर्थ सहकारी बँकेच्या अहमदनगर जिल्ह्यात सहा व पुणे जिल्हात सहा व प्रस्तावित दोन अशा चौदा शाखा आहेत.

या कार्यक्रमावेळी सभासदांना १२ टक्के लाभांश देण्याचा निर्णय घेण्यात आला. बँकेचा मागील वर्षीचा अहवाल वाचन बँकेचे मुख्य कार्याकारी अधिकारी जी.एस.सुपेकर यांनी केले. बँकेचे २६ वे वर्ष असून बँकेकडे २५ कोटी रुपयांचा निधी आहे तर २२० कोटी ४४ लाख रुपयांच्या ठेवी आहेत. बँकेने १२६ कोटी ०४ लाख रुपयांचे कर्ज वाटप केले असून ११९ कोटी ३८ लाख रुपयांची बँकेची गुंतवणूक आहे. चालू आर्थिक वर्षामध्ये बँकेला ०३ कोटी ०५ लाख ४९ हजार ११२ रुपयांचा नफा झाला असून बँकेला सतत ऑडिट वर्ग अ मिळाला आहे.

या वार्षिक सर्वसाधारण सभेत २०२२-२३ च्या अहवाल स्वीकारला व ताळेबंद पत्रक काढून नफा तोटा, लेखापरीक्षण अहवाल, व त्याची दोष दुरुस्ती केली नफा वाटणीस मंजुरी, अंदाज पत्रक मंजुरी,जास्त झालेल्या कर्जे मंजुरी, रिझर्व्ह बँकेच्या धोरणानुसार वैद्यानिक लेखापरीक्षण नियुक्ती मान्यता दिली बँकेच्या संचालक व त्यांचे नातेवाईकांना दिलेल्या कर्जाची माहिती घेणे बँकेसाठी नवीन जागा व इमारत व दुरुस्ती,बाहेरील निधी उभारणी अधिकार, डेव्हलपमेंट प्लॅन वर्षीक कार्यवाहीचा आढावा, सभासदांना बँकींग शिक्षण व प्रशिक्षण,पोटनियम दुरुस्ती,स्टाफींग पॅटर्नला, अशा विविध विषयांवर मान्यता देऊन मंजुरी दिली.

बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी.एस.सुपेकर यांनी सूत्रसंचालन केले व बँकेचे मुख्य प्रवर्तक जेष्ठ संचालक अँड अशोक भिकाजी शेळके यांनी सर्वांचे आभार मानले अशी माहिती कोरेगाव भिमा शाखेचे व्यवस्थापक मच्छिंद्र कवाद यांनी “शिरूर हवेली न्यूज” ला दिली.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें