लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भावडी येथील अट्टल गुन्हेगार दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार

लोणीकंद प्रतिनिधी 

लोणीकंद, (पुणे) : लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भावडी ता.हवेली जि. पुणे येथील बिरा रामदास श्रीराम वय (३५) या आरोपीला पुणे शहर, जिल्हा, व पिंपरी चिंचवड परिसरातून २ वर्षांसाठी तडीपार करण्यात आला आहे. लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काइंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आसपासच्या भागात दहशत निर्माण करुन लोकांना तसेच सामान्य नागरीकांना वारंवार त्रास देऊन दहशत निर्माण करायचे. लोकांच्या जिवीतास धोका निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या कृत्यामुळे लोकांच्या मनातून कायद्याविषयी संभ्रम निर्माण होवु नये, तसेच सदर सराईत गुन्हेगारावर कायद्याचा वचक बसावा या उद्देशाने हि कारवाई करण्यात आली.

गुन्ह्यांचा अभिलेख तपासुन सदर इसम यांना महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ प्रमाणे तडीपार करणेबाबत पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांना प्रस्ताव पाठविला असता,शशिकांत बोराटे यांनी सदर सराईतास पुणे शहर, जिल्हा, व पिंपरी चिंचवड परिसरातून २ वर्षांसाठी तडीपार केले आहे.

सदरची कामगिरी लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मारूती पाटील, सीमा ढाकणे, सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलीस अंमलदार प्रशांत कापुरे, सागर कडू यांनी केली आहे.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें