लोणीकंद पोलीस स्टेशनच्या वतीने भव्य महिला रोजगार प्रशिक्षण शिबिर

 

 

प्रतिनिधी लोणीकंद 

हवेली तालुक्यातील लोणीकंद येथे पुणे पोलीस आयुक्तालयांर्तगत, कला, क्रिडा, साहित्य शांतीदूत परिवार यांच्या संयुक्त विद्यमानाने लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य महिला रोजगार प्रशिक्षण शिबिर शनिवार दि. १६/०९/ २०२३ रोजी स.११ वा लोणीकंद पोलीस स्टेशन या ठिकाणी आयोजन केले आहे.

या शिबिराचे संकल्पना, सिमा ढाकणे पोलीस निरीक्षक (गुन्हे) लोणीकंद पो.स्टे, मारुती पाटील पोलीस निरीक्षक (गुन्हे) लोणीकंद पो.स्टे,योगेश जाधव( संस्थापक अध्यक्ष ), श्रीमती अनिता राठोड (सचिव प्रशिक्षक ) हे या शिबिरामध्ये प्रशिक्षण देणार आहे.

या प्रशिक्षण शिबिरामध्ये महिला भगिनींना घर बसल्या सक्षम व स्वावलंबी बनविण्यासाठी विविध साहित्यांची निर्मिती शोभेच्या वस्तु व आणखी गृहपयोगी वस्तु बनविण्याचे प्रशिक्षण या माध्यमातुन दिले जाणार आहे तरी या परिसरातील सर्व महिला भगिनींनी उपस्थित राहुन या उपक्रमाचा लाभ घ्यावा. अशी माहिती लोणीकंद गावचे ज्येष्ठ नागरिक तसेच विशेष कार्यकारी अधिकारी सुरेश बापू कंद यांनी “शिरूर हवेली न्यूज” ला दिली.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें