लोणीकंद पंचायत समिती गणातून ओंकार हनुमंत कंद इच्छुक

लोणीकंद (प्रतिनिधी) : पुणे जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जिल्हा परिषद व पंचायत समिती गटांची नवीन प्रारूप यादी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ अंतर्गत तयार झालेल्या या प्रारूप रचनेनुसार हवेली तालुक्यात मोठ्या प्रमाणात फेरबदल झाले असून, पूर्वी अस्तित्वात असलेल्या १३ जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांचे पुनर्रचन करून ६ जिल्हा परिषद गट व १२ पंचायत समिती गण निश्चित करण्यात आले आहेत.

नवीन प्रारूपात लोणीकंद पंचायत समिती गणात निरगुडी, वडगाव शिंदे, भावडी, तुळापुर, फुलगाव, लोणीकंद, वढू खुर्द ही गावे समाविष्ट आहेत. याच गणातून पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा कंद यांचे कट्टर समर्थक ओंकार हनुमंत कंद यांनी आपली उमेदवारीची तयारी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे.

सामाजिक कार्यात सक्रीय असलेले ओंकार कंद हे गेल्या अनेक दिवसापासून जनसंपर्कात असून, स्थानिक प्रश्नांवर सातत्याने भुमिका घेत आले आहेत. त्यामुळे त्यांचा जनाधार वाढत असल्याचे बोलले जात आहे.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें