लोणीकंद पंचायत समिती गणातून इच्छुकांची कंबर कसण्यास सुरुवात; राजकीय रणसंग्रामाचे पडघम  

 

लोणीकंद: पुणे जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकांचे बिगुल वाजताच लोणीकंद पंचायत समिती गणात इच्छुकांनी कसली कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने जाहीर केलेल्या नवीन प्रारूप यादीनुसार हवेली तालुक्यात मोठ्या प्रमाणात फेरबदल झाले असून, नव्या गणरचनेमुळे अनेकांचे राजकीय गणित बदलले आहे.

लोणीकंद पंचायत समिती गणात निरगुडी, वडगाव शिंदे, भावडी, तुळापुर, फुलगाव, लोणीकंद आणि वढू खुर्द या सात गावांचा समावेश करण्यात आला आहे. या गणातून इच्छुकांनी जोरदार जनसंपर्क मोहीम उघडली असून, गावोगावी बैठका, सामाजिक उपक्रम आणि विविध मंचांवरून आपली उपस्थिती ठसवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

गेल्या काही वर्षांपासून स्थानिक राजकारणात सक्रीय असलेले अनेक चेहरे आता थेट गणपातळीवर आपल्या ताकदीची चाचपणी करू लागले आहेत. पाणी, रस्ते, शौचालये, पथदिवे, महिला बचत गटांना सुविधा अशा स्थानिक प्रश्नांवर आवाज उठवत ‘लोकांसोबत सतत’ असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न इच्छुकांकडून सुरू आहे.

नव्या रचनेत गावांची नव्याने मांडणी झाल्याने मतदारसंघांचे बलकाट बदलले असून, याचा थेट फायदा आणि तोटा काही इच्छुकांना होणार आहे. त्यामुळे अनेकांनी रणनीतीत बदल करत नव्या गणरचनेनुसार मांडणी सुरू केली आहे. इच्छुकांची ताकद आणि जनाधार यांचा बारकाईने आढावा घेतला जात आहे. इच्छुकांच्या प्रचारात आता सोशल मीडियाचाही प्रभावी वापर दिसून येतो आहे. आगामी निवडणुकीत येथे रंगतदार लढत पाहायला मिळणार, हे निश्चित!

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें