वाहन चोरीचे दोघे जेरबंद; युनिट ६ गुन्हे शाखेची यशस्वी कारवाई – पुणे शहरात दोन चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश

पुणे : शहरात वाहन चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी गुन्हे शाखेच्या युनिट ६ पथकाने केलेल्या धडक कारवाईत दोन वेगवेगळ्या चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. पोलिसांनी दोन आरोपींना अटक करत चोरीस गेलेल्या दुचाकींसह हस्तगत केले असून संबंधित पोलीस ठाण्यांच्या ताब्यात कारवाईसाठी सोपविण्यात आले आहे.

दि. ९ जुलै २०२५ रोजी युनिट ६ गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी गुन्हे प्रतिबंधात्मक गस्तदरम्यान ही कारवाई केली. पोलीस अंमलदार सचिन पवार यांना पेरणे फाटा, लोणीकंद येथे एक इसम चोरीची स्प्लेंडर प्लस दुचाकी विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून दीपक राजेंद्र बिडगर (वय २३, रा. न्हावरा, शिरूर, पुणे) याला दुचाकीसह ताब्यात घेण्यात आले.

प्राथमिक चौकशीत आरोपीने उडवा-उडवीची उत्तरे दिल्यानंतर वाहनाच्या इंजिन व चासी नंबरची पडताळणी केली असता, ती दुचाकी शिक्रापूर पोलीस ठाण्यातील गु.र.नं. ६२०/२०१९ अन्वये भा.दं.वि. कलम ३७९ अंतर्गत चोरीस गेलेली असल्याचे निष्पन्न झाले.

दुसऱ्या घटनेत याच युनिटच्या पथकाने भावडी रोड, वाघोली परिसरात मच्छिंद्र दिगंबर खैरनार (वय ४१, रा. रांजणगाव, पुणे) याला संशयितरीत्या होंडा शाहीन दुचाकीसह अटक केले. चौकशीत ही दुचाकी म्हाळुंगे पो. स्टे. गु.र.नं. ३५७/२०२३ अन्वये चोरीस गेल्याचे उघड झाले.

या दोन्ही कारवाया मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त (आर्थिक व सायबर) श्री. विवेक मासाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे २) श्री. राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या.
ही यशस्वी कामगिरी युनिट ६ चे पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, सपोनि राकेश कदम, मदन कांबळे तसेच पोलीस अंमलदार बाळासाहेब सकटे, नितीन मुंढे, सारंग दळे, कानिफनाथ कारखेले, प्रशांत कापुरे, गिरीष नाणेकर, सुहास तांबेकर, ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषीकेश व्यवहारे, शेखर काटे, नितीन धाडगे व बाळासाहेब तनपुरे यांच्या समवेत पार पडली.

गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांची ही तत्पर कारवाई कौतुकास्पद ठरत आहे.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें