प्रखर बीम व लेझर लाईटवर बंदीचा आदेश; नियमभंग केल्यास शिक्षेची तरतूद  

पुणे – लोहगाव येथील तांत्रिक व नागरी विमानतळाच्या परिसरात तसेच पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कोणत्याही कार्यक्रमात आकाशात प्रखर बीम लाईट किंवा लेझर बीम लाईट सोडण्यावर बंदी घालण्यात आली आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत हा प्रतिबंधक आदेश पोलीस सह आयुक्त तथा विशेष कार्यकारी दंडाधिकारी रंजन कुमार शर्मा यांनी जारी केला आहे.

भारतीय वायुसेनेने यासंदर्भात आपली चिंता व्यक्त करताना म्हटले की, अशा तीव्र प्रकाश किरणांमुळे विमानचालकांचे लक्ष विचलित होऊन संभाव्य अपघाताचा धोका निर्माण होतो. रात्रीच्या वेळी विशेषतः विमानतळाच्या एटीसी टॉवर आणि रनवेवरील दिशादर्शक प्रकाश यंत्रणेमुळे वैमानिकांना योग्य दिशा मिळते. परंतु, सभासमारंभात वापरले जाणारे लेझर आणि बीम लाईट हवेत गेल्यास त्याचा प्रतिकूल परिणाम उड्डाणावर होतो, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर विमानतळाच्या १५ किमी परिघातील वायुक्षेत्रात तसेच पुणे पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व भागांमध्ये या लाईट्सचा वापर ६० दिवसांसाठी बंदी घालण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता कलम २२३ अंतर्गत कारवाई केली जाणार आहे.

हा आदेश दिनांक ९ जुलै २०२५ पासून लागू असून स्थानिक कार्यक्रम आयोजकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

संपर्क: पोलीस उप-आयुक्त (विशेष शाखा), पोलीस आयुक्त कार्यालय, पुणे फोन: ०२०-२६२०८२८६ / २६२०८२०२ / २६१२३६६७ Email: sbpisecurity-pune@nic.in

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें