वढू खुर्द (ता. हवेली) : येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी महेंद्र विलास खांदवे यांची बिनविरोध निवड झाली आहे. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र येण्याचा निर्धार करत ग्रामपंचायत सदस्यांनी एकमताने खांदवे यांना पाठिंबा दिला.
नवनिर्वाचित सरपंच महेंद्र खांदवे हे सामाजिक भान ठेवून कार्य करणारे, सर्वसमावेशक विकासाला अग्रक्रम देणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या निवडीमुळे गावात आनंदाचे व समाधानाचे वातावरण आहे.
ग्रामस्थ व सदस्यांच्या उपस्थितीत शांततेत निवड प्रक्रिया पार पडली गावातील सर्वांच सहकार्य व एकजूट हीच या यशामागील खरी ताकद असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
खांदवे यांनी निवडीनंतर आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “गावाच्या विकासासाठी पारदर्शक व सर्वसमावेशक प्रशासन देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील. सर्व ग्रामस्थांचा सहभाग हेच माझा खरा बळ आहे.