प्रतिनिधी लोणीकंद
हवेली तालुक्यातील वढू !!खुर्द!! येथे दि.१४/९/२०२३ रोजी मायभूमी फाऊंडेशन, वढू खुर्द व जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंट, वाघोली यांच्या संयुक्त विद्यमाने व मायभूमी फाऊंडेशनचे अध्यक्ष नंदकुमार डोके यांच्या मार्गदर्शनाखाली वढू खुर्द येथील डोंगरावर वृक्षारोपण करण्यात आले.
मायभूमी फाऊंडेशनच्या माध्यमातून वढू व. परिसरातील डोंगरावर गेले अनेक वर्षांपासून वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन चे काम परिसरात चालू आहे. तसेच वाढते तापमान, पडणारा दुष्काळ, हवेतील कमी झालेला ऑक्सिजन, व पर्यावरणाची झालेली हानी भरून काढण्यासाठी प्रत्येकाने वृक्षारोपण करण्याची अत्यंत गरज आहे असा संदेश अध्यक्ष नंदकुमार डोके यांनी विद्यार्थ्यांना दिला.
यावेळी मोठ्या संख्येने राईसोनी कॉलेज येथील विद्यार्थी , विद्यार्थिनी, शिक्षकवृंद,तसेच माय भूमी फाउंडेशन चे अध्यक्ष नंदकुमार डोके, तसेच बाबासाहेब आंबोरे ,चेतन शिंदे, सतीश शिंगणे, काका डोके, सदस्यांसह आदी उपस्थित असल्याचे मायभूमी फाउंडेशनचे सदस्य सतीश शिंगणे यांनी “शिरूर हवेली न्यूज” शी बोलताना सांगितले.