वाघोली : सन २०१४ पासून प्रलंबित असलेल्या वाघोली महावितरण शाखा विभाजनाच्या प्रस्तावास अखेर मंजुरी मिळाली असून, या निर्णयामुळे परिसरातील वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर वीज वितरणाची कार्यक्षमता वाढणार आहे.
हा प्रस्ताव अनेक वर्षांपासून रखडला होता. मात्र शिरूर-हवेली मतदारसंघाचे आमदार माऊली कटके यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा करून महावितरणच्या मुंबई कार्यालयाकडे ठोस पुरावे व मागणी सादर केली. त्यांच्या प्रयत्नांना यश येत अखेर मुंबई महावितरण कार्यालयाकडून वाघोली शाखा विभाजनास मान्यता देण्यात आली.
या निर्णयाबाबत महाराष्ट्र राज्य ऊर्जा विभागाचे मानव संसाधन संचालक राजेंद्र पवार साहेब यांनी विशेष सहकार्य केल्याबद्दल स्थानिक जनतेतून त्यांचे आभार मानले जात आहेत.
या निर्णयामुळे वाघोलीसह परिसरातील लोणीकंद, बकोरी, खराडी, वाडे वस्ती, भावडी, कोलवडी या भागातील वीज ग्राहकांना अधिक जलद आणि सुलभ सेवा मिळण्यास मदत होणार आहे. तसेच तांत्रिक अडचणी दूर होऊन वीज पुरवठा अधिक सक्षम होईल, अशी अपेक्षा आहे.
महावितरणच्या या निर्णयामुळे जनतेच्या दीर्घकाळच्या मागणीला न्याय मिळाला असून, आमदार कटके यांचा हा एक सकारात्मक विकासाभिमुख निर्णय म्हणून गौरव करण्यात येत आहे.
सन २०१४ पासून मागणी होत असलेल्या वाघोली शाखा विभाजन प्रस्तावास शिरूर हवेलीचे आमदार माऊली कटके यांच्या पाठ पुराव्यामुळे मुंबई महावितरण कार्यालयाकडून मंजुरी मिळाली तसेच महाराष्ट्र राज्य मानव संसाधन संचालक ऊर्जा विभाग राजेंद्र पवार यांनी विशेष प्रयत्न केले – सुधीर दळवी सामाजिक कार्यकर्ते .