वाडेबोल्हाई (ता. हवेली) : वाघोली-राहू रस्त्यावर वाडेगाव फाट्याजवळ एस.टी. बस आणि कार यांच्यात शनिवारी सकाळी अपघात झाला. ओव्हरटेक करताना दोन्ही वाहने रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्यात जाऊन उलटून अपघात घडला, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. स्थानिक ग्रामस्थांनी सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले, वाघोली-राहू-पारगाव रस्ता हा हवेली व दौंड तालुक्यांना जोडणारा महत्त्वपूर्ण मार्ग असून या रस्त्याची रुंदी कमी असल्याने वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत. त्यामुळे या रस्त्याचे तातडीने रुंदीकरण करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
|