शिरूर: पानमसाल्याचा मोठा साठा जप्त – एकूण १ लाख १६ हजारांचा मुद्देमाल जप्त, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल  

शिरूर, दि. ८ जून: शिरूर पोलीसांनी एका युवकाच्या खोलीवर छापा टाकून १ लाख १६ हजारांचा प्रतिबंधित पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी २३ वर्षीय हिमांशु धर्मवीर सिंग याच्याविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ व अन्न सुरक्षा कायद्यानुसार गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस ठाण्याच्या मिळालेल्या माहितीनुसार, ही कारवाई ८ जून २०२५ रोजी सायंकाळी ७:४५ वाजता शिरूरमधील जिओ पेट्रोलपंपासमोरील आदित्य स्नॅक्स सेंटर टपरीमागील खोली येथे करण्यात आली. पोलिस कॉन्स्टेबल नितेश दत्तात्रय थोरात यांनी फिर्याद दाखल केली असून, आरोपी हिमांशु सिंग याच्याकडून विविध कंपन्यांचे खालील प्रमाणे पानमसाल्याचे व सुगंधित तंबाखूचे मोठ्या प्रमाणात पाकीटांचे साठे सापडले:

हिरा पान मसाला – १०५ पाकीटे ₹१८,४८८

विमल पान मसाला – २६१ पाकीटे ₹५१,६७८ व ३७ पाकीटे ₹१७,३९०

गोवा १००० पान मसाला – २७ पाकीटे ₹५,४००

रॉयल ७१७ टोबॅको – १०० पाकीटे ₹४,४००

व्ही वन टोबॅको – २२० पाकीटे ₹४,८४०

डायरेक्टर स्पेशल पान मसाला – २८ पाकीटे ₹७,०००

शॉट ९९९ टोबॅको – २८ पाकीटे ₹३,५००

इतर विमल पानमसाला पाकीटे – १८ पाकीटे ₹३,३६६

एकूण जप्त मालमत्ता किंमत: ₹१,१६,०५४/-

प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे की, आरोपी हिमांशु सिंग याने विक्रीसाठी प्रतिबंधित पदार्थांचा साठा करून ठेवला होता. महाराष्ट्र शासनाच्या अन्न व औषध प्रशासनाच्या १२ जुलै २०२४ रोजीच्या अधिसूचनेनुसार गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखू यांचे उत्पादन, साठवणूक, विक्री व वाहतूक यावर बंदी आहे, मात्र या आदेशाचे उल्लंघन करून आरोपीने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हा साठा केला होता.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 223, 274, 275, 123 तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 चे कलम 26(2)(i), 26(2)(iv), 27(3)(d), 27(3)(e), 30(2)(a), 59 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई शिरूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार उबाळे यांनी गुन्हा दाखल केला असून, तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें