पिंपरी सांडस येथील “आखिल पिंपरी सांडस” दहिहंडी उत्सव उत्साहात साजरा 

 

 

लोणीकंद प्रतिनिधी

हवेली तालुक्यातील पिंपरी सांडस येथे ग्रामीण भागातील सर्वात मोठ्या दहीहंडी उत्सवाचे नियोजन “आखिल पिंपरी” सांडस दहीहंडी उत्सव आयोजक  संस्थापक संतोष भैय्या कंचे,व अशोक भोरडे (ग्रा.पं.सदस्य) यांनी मोठ्या जल्लोषात साजरी केली. हे गेली १३ वर्षापासुन दहीहंडी उत्सव साजरा करतात. यावर्षीही भव्य दिव्य दहीहंडीचे नियोजन यांनी केले. यावर्षी दहिहंडी फोडण्याचा मान पिंपळगाव येथील श्री. “सिद्धेश्वर गोविंदा” पथकाने पटकाविला.

 

या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध साऊंड सिस्टम, लेझर लाईट, ढोल ताशा पथके यांच्यासह परिसरातील तरुणाईची उपस्थिती या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते.

यावर्षी या कार्यक्रमाच्या निमित्ताने पिंपरी सांडस गावातील सुपुत्र ज्यांनी गेली 28 वर्षे देशाची सेवा केलेले, सोमनाथ पंढरीनाथ भोरडे यांची सेवा निवृत्त झाल्याबद्दल गावात भव्य मिरवणुक काढून ग्रामस्थांच्या वतीने सत्कार केला.

यावेळी महा.राज्य, क्रीडा आघाडी अध्यक्ष संदिप आप्पा भोंडवे, रविंद्र नारायण कंद उपसभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती हवेली,संदिप आबा सातव अध्यक्ष भा.ज.पा. युवा मोर्चा पुणे जिल्हा, शाम गावडे पं.समिती सदस्य हवेली, साधना सोमनाथ भोरडे लोकनियुक्त सरपंच पिंपरी सांडस,गोरक्ष भोरडे उपसरपंच पिंपरी सांडस, ग्रा.प. सदस्य, मंगेश गवारे, उज्वला निकाळजे, अध्यक्ष हरिष भोरडे,ऋषभ शेटीया,अजय ढगे, विकास भोरडे, ऋषीकेश भोरडे, ऋषीकेश वायकर, सुरज ढगे,व पिंपरी सांडस आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, सरपंच, उपसरपंच, महिला भगिनी ग्रा.सदस्य आदी ग्रामस्थ या भव्य दिव्य दहीहंडी उत्सवासाठी उपस्थित असल्याचे आयोजक अशोक भोरडे यांनी “शिरूर हवेली न्यूज” शी बोलताना सांगितले.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें