हायड्रोक्लोरिक ऍसिड वाहून नेणारा टँकर ताम्हिणी घाटात पलटी; जीवितहानी टळली  

डोंगरवाडी (ता. मुळशी), ता. २५ मे २०२५ – सकाळी ६.३० वाजता महाड येथून पुण्याकडे निघालेला हायड्रोक्लोरिक ऍसिडचा टँकर (MH 04 HD 4530) ताम्हिणी घाटातील डोंगरवाडी गावाजवळ धुक्यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने खचलेल्या भागावरून पलटी झाला. सुमारे २८ हजार लिटर ऍसिड वाहून नेणारा हा टँकर मे. बीटा केमिकल, महाड एमआयडीसी येथून मे. पुणे मार्केटिंग, भेकराईनगर फुरसुंगी येथे जात होता.

अपघातावेळी वाहन चालक टँकरमध्ये अडकले होते. मात्र, मागून येणाऱ्या बस चालकाने प्रसंगावधान राखत बस थांबवली व चालकाला सुखरूप बाहेर काढले. चालकाच्या हाताच्या बोटांना किरकोळ जखम झाली आहे.

टँकरमधील ऍसिड दरीत वाहून गेले असून त्याचा परिणाम म्हणून परिसरात वाहनचालकांच्या डोळ्यांची जळजळ होऊ लागली होती. सुमारे ९० टक्के ऍसिड टँकरमधून गळाले आहे. तत्काळ प्रतिसाद देत पीएमआरडी अग्निशमन दल, मुळशी आपत्ती व्यवस्थापन टीम, LCS रिस्पॉन्स टीम, रायगड रेस्क्यू टीम व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी मदतकार्य सुरू केले. क्रेनच्या साह्याने पलटी झालेला टँकर बाजूला करण्यात आला आहे.

या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, ही दिलासादायक बाब मानली जात आहे. संबंधित यंत्रणांनी तत्काळ प्रतिसाद देत परिस्थिती नियंत्रणात आणली.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें