PMRDA ला शासनाच्या 100 दिवसांच्या स्पर्धेत राज्यात तिसरा क्रमांक; आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांचे अधिकारी-कर्मचाऱ्यांना कौतुक

पुणे : शासनाच्या 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा स्पर्धेत पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (PMRDA) राज्यभरात तिसरा क्रमांक पटकावण्याचा मान मिळवला आहे. राज्यातील ९५ महामंडळे, प्राधिकरणे, शासकीय व निमशासकीय संस्था, कंपन्या आदींच्या कामगिरीच्या मूल्यांकनातून हे यश PMRDA च्या वाट्याला आले आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल महानगर आयुक्त व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. योगेश म्हसे (आयएएस) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. “हे यश म्हणजे अधिक चांगल्या कार्यासाठीची प्रेरणा आणि नागरिकांप्रती जबाबदारीची जाणीव आहे,” असे म्हसे यांनी सांगितले. तसेच PMRDAच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे तसेच मार्गदर्शक नेतृत्वाचे त्यांनी विशेष आभार मानले.

“ही केवळ स्पर्धा नव्हे, तर जनहितासाठी झपाट्याने काम करत राहण्याचं दायित्व आहे,” असेही ते म्हणाले.

राज्य शासनाच्या वतीने विविध विभागांनी केलेल्या कार्यालयीन सुधारणांचे परीक्षण व मूल्यमापन करण्यात आले होते. कामकाजातील पारदर्शकता, वेग, नागरिक केंद्रित सेवा आणि नवोपक्रम यांसारख्या निकषांवर आधारित ही स्पर्धा होती. PMRDA ने या सर्व क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत राज्यभरातील तिसरा क्रमांक पटकावला.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें