अनधिकृत होर्डिंग्जवर पीएमआरडीएची कारवाई अटळ; धोकादायक फलक थेट तोडले जातील

पुणे – पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (PMRDA) हद्दीत परवानगीशिवाय लावण्यात आलेल्या होर्डिंग्ज, बॅनर आणि जाहिरात फलकांवर आता थेट कारवाई केली जाणार आहे. धोका निर्माण करणारे, शहराच्या सौंदर्यावर गदा आणणारे व कायद्याच्या चौकटीबाहेर असलेले सर्व जाहिरात फलक पीएमआरडीएच्या कारवाईच्या टप्प्यात आहेत.

“जाहिरात करा… पण कायदेशीर मार्गाने!” असा इशारा देत पीएमआरडीएने स्पष्ट केले आहे की, परवानगीशिवाय उभारण्यात आलेल्या जाहिरात फलकांना कोणतीही दया दाखवली जाणार नाही. अशा फलकांची पाहणी सुरू असून, संबंधित ठिकाणी थेट तोडक कारवाई करण्यात येणार आहे.

सदर कारवाईमुळे होर्डिंग उद्योगातील अनधिकृत व्यवहारांवर लगाम बसेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. सार्वजनिक सुरक्षेला धोका पोहोचवणारे, रहदारीस अडथळा निर्माण करणारे किंवा विजेच्या वाहिन्यांच्या जवळ असलेले फलक हे अपघाताला निमंत्रण देतात. त्यामुळे अशा फलकांचे त्वरित हटवणे गरजेचे असल्याचे पीएमआरडीएने नमूद केले आहे.

जाहिरात करणाऱ्या एजन्सी, व्यावसायिक आणि व्यक्तींना विनंती करण्यात येते की, कोणत्याही प्रकारची जाहिरात करण्यापूर्वी प्राधिकरणाची मंजुरी घ्यावी. अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें