कोंढवा खुर्द येथे भास्कर जाधव,शरद कोळी,सुषमा अंधारे यांचा सत्कार करताना माजी आमदार महादेव बाबर,प्रसाद बाबर व मान्यवर (छाया:संदिप डोके हडपसर)
हडपसर दि.११(प्रतिनिधी संदिप डोके)
लोकशाही व घटना संपविण्याचे काम केले जात असून, संविधानाला आवाहन देण्याचे काम सध्या सुरु आहे. अदानी व अंबानी यांना अच्धे दीन आणले सर्वसामान्य व्यक्तीला नाही. महिलांना मणिपूरमध्ये विवस्ञ केले साधी चौकशी केली नाही. संविधान अडचणीत आले आले आहे. असे मत शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांनी कोंढवा खुर्द येथील होवू दे चर्चा या मेळाव्यात व्यक्त केले.
कोंढवा खुर्द येथे हडपसर विधानसभा मतदार संघातील उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचा होवू दे चर्चा मेळाव्याचे आयोजन माजी आमदार महादेव बाबर, युवासेना नेते पै प्रसाद बाबर यांनी केले होते. यावेळी शिवसेना नेते आमदार सचिन आहीर, आमदार भास्कर जाधव, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे, शरद कोळी, माजी आमदार चंद्रकांत कोकाटे, रघुनाथ कुचीकर, कल्पना थोरवे, बाळासाहेब ओसवाल, समीर तुपे, विजय देशमुख, तानाजी लोणकर, भरत चौधरी, राजेंद्र बाबर, मेघा बाबर, संगीता ठोसर, प्राची आल्हाट शाखाप्रमुख सचिन कापरे ,शंकर लोणकर,दादा भणगे ,गणेश कामठे,अमर कामठेआदींसह परिसरातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुषामा अंधारे म्हणाल्या की,पुणे विद्यापीठाचा उड्डाणपूल पाडण्यात आला. तो पुन्हा बांधण्यात येणार आहे. हा आपलाच पैसा आहे, गॅस चे भाव वाढले मात्र यावर कोणीही प्रश्न विचारायला तयार नाही. प्रश्न विचारलाच तर देशद्रोही ठरविण्यात येते, किंवा हिंदू मुस्लिम वाद लावला जातो. नोटबंदीने सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागला. महागाईमुळे सामान्य जनता होरपळून निघाली आहे. हिंदुत्ववादी सरकार असताना हिंदू खतरे मे कसा काय? भाजप सत्तेत नसताना देवेंद्र फडणवीस म्हणायचे की इच्छा असेल तर काम होते आमचे सरकार आले तर तत्काळ मार्ग काढू पण ते सत्तेत आल्यावर त्यांनी काय केले? आरक्षण हा विषय केंद्राचा आहे. भाजपचे देशात ३०० खासदार असून प्रश्न सोडवायला काय अडचण आहे? गुणरत्न सदावर्ते या माणसाने मराठा आरक्षण आणि मराठा समजला मिळणाऱ्या सुविधांविषयी कायम विरोध केला.हा माणूस कोणाचा आहे? मराठा आरक्षणाचा प्रश्न भिजत ठेवण्याचे काम भाजपने केले आहे. समान नागरी कायदा आणण्याची मागणी करण्यात येते. मात्र समान नागरी कायदा आणि आरक्षण याचा काहीही सबंध नाही. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की समान नागरी कायद्याच्या मुद्द्यावर पक्ष सोडत असल्याचे सांगितले. काय आहे समान नागरी कायदा?नीलम गोऱ्हे यांना कळतो का समान नागरी कायदा?१) पहिली पत्नी हयात असताना दुसरी पत्नी करता येणार नाही. २) वडिलांच्या संपत्तीत मुलीचा ससमान अधिकार ३) पतीच्या संपत्तीत पत्नीचा समान अधिकार ४) कोणतेही मुल दत्तक घेण्याचा अधिकार, बाळासाहेबांची जी भूमिका आहे तीच भूमिका उद्धव ठाकरे यांची आहे. मातोश्री वरील समान नागरी कायद्याच्या चर्चेसाठी नीलम गोऱ्हे थांबल्या नाहीत. त्यांनी केवळ खुर्ची टिकविण्यासाठी नीलम गोऱ्हे यांनी पक्ष बदलला. आनंदाचा शिधामध्ये येणारे साहित्य हे जनावरे खाणार नाहीत असे निकृष्ट दर्जाचे साहित्य वाटले जाते. पिकत नाही म्हणून बाप अन् नोकरी लागत नाही म्हणून पोरगं आत्महत्या करत आहे ही परिस्थिती आहे.भाजपा सरकारकडून अश्या अनेक प्रश्नांना तोडगा निघत नसल्याचे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे नी आपल्या भाषणात सांगितले.