महावितरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; गायब ट्रान्सफॉर्मर पाच वर्षांनी उघडकीस..!

अधिकाऱ्यांवर संशयाचा काटा; ट्रान्सफॉर्मर हरवला की ‘हरववला’?

वाघोली (ता. हवेली) : गावातील गेरा प्रॉपर्टीज प्रकल्पासाठी बसविण्यात आलेला तब्बल ३.८० लाख रुपये किमतीचा महावितरणचा ट्रान्सफॉर्मर (रोहित्र) गायब झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे याप्रकरणी अखेर पाच वर्षांनी वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, गायब ट्रान्सफॉर्मर पाच वर्षांनी उघडकीस झाल्याने महावितरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे महावितरणच्या अंतर्गत अधिकाऱ्यांच्या संगनमताचा संशय व्यक्त केला जात आहे.

गट क्रमांक १३४३/बी, चोखीधानी रोडवरील ‘वर्ल्ड ऑफ जॉय’ या गेरा प्रॉपर्टीज प्रकल्पासाठी २२/०.४ केव्ही क्षमतेचा २०० केव्हिएचा रोहित्र (डीपी नं. ०५३३३५२) २०१९ साली बसवण्यात आला होता. २०२० मध्ये एलटी कनेक्शन बंद करून एचटी मंजूर झाल्यानंतर हा ट्रान्सफॉर्मर निष्क्रिय अवस्थेतच होता. परंतु गेल्या पाच वर्षांत महावितरणच्या शाखा कार्यालयाने वरिष्ठांना याची माहिती दिली नाही.

एप्रिल २०२५ मध्ये ‘गती शक्ती’ अ‍ॅपद्वारे सुरू असलेल्या मॅपिंगदरम्यान डीपी गायब असल्याचे उघड झाले. सहाय्यक अभियंता दीपक बाबर यांनी चौकशी केली असता, ट्रान्सफॉर्मर कुठे आहे याचा थांगपत्ता लागू शकला नाही. त्यामुळे अखेर त्यांनी वाघोली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यां विरोधात गुन्हा दाखल केला.

मात्र, हा फक्त चोरीचा प्रकार नसून, अंतर्गत अधिकाऱ्यांच्या संमतीशिवाय हे शक्य नसल्याची चर्चा आहे. इतक्या मोठ्या डीपीला हलवण्यासाठी वाहन, मनुष्यबळ आणि मंजुरी आवश्यक असते. मग ट्रान्सफॉर्मर गायब होतो आणि कोणालाही काही कळत नाही – हे सामान्य नागरिकांच्या पचनी पडत नाही.

फक्त एकच डीपी? उरलेले दोन कुठे?

या प्रकरणात एक नव्हे तर तीन ट्रान्सफॉर्मर गायब झाल्याची माहिती आहे. त्यापैकी दोन डीपी मिळाले, असे सांगितले जात असले तरी याची कोणतीही अधिकृत नोंद नाही. मिळाले तरी ते कुठे आणि कोणाकडून – हेही गुलदस्त्यातच आहे.

पाच वर्षे मौन का?

या प्रकाराबाबत महावितरणने पाच वर्षे काहीही का सांगितले नाही? शाखा कार्यालयाने माहिती दडवली का? वरिष्ठांनी दुर्लक्ष केले का? बिल्डरवर अजून गुन्हा का नाही? – असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

दुटप्पी धोरणाचा नागरिकांमध्ये संताप

सामान्य ग्राहकांनी वीजबिल थकवल्यास तात्काळ कारवाई केली जाते, मात्र ट्रान्सफॉर्मर हरवला तरी कोणावरही जबाबदारी नाही – हे महावितरणच्या दुटप्पी भूमिकेचे उत्तम उदाहरण असल्याची टीका स्थानिक नागरिकांनी केली आहे.

घोटाळ्याचा गंध, जबाबदारी कोणी घेणार?

हा केवळ ट्रान्सफॉर्मर हरवण्याचा नव्हे, तर जबाबदारीच्या लोपाचा गंभीर प्रकार आहे. हा घोटाळा नेमका कुणाच्या कार्यकाळात घडला? तात्कालीन अधिकारी दोषी का नाहीत? आणि एवढ्या वर्षांनी महावितरणला जाग का आली?

जनतेचा सवाल’ :

२०१९: डीपी बसवला

२०२०: कनेक्शन बदल – डीपी निष्क्रिय

२०२५: मॅपिंगदरम्यान गायब असल्याचे स्पष्ट

गुन्हा नोंद: मे २०२५

पाच वर्षे महावितरण गप्प का?

बिल्डरवर कारवाई का नाही?

ट्रान्सफॉर्मर कुणाच्या संगनमताने ‘गायब’?

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें