पदभार स्वीकारताच डंपर माफियांना दणका ; लिंगाडे यांची धडाकेबाज कारवाई

नियमांच्या चौकटीतच वाहन चालवण्याचा डंपर माफियांना लिंगाडेंचा खणखणीत इशारा 

वाघोली; वाहतूक शाखेचे नवे सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय लिंगाडे यांनी पदभार स्वीकारताच वाघोलीतील बेकायदेशीर अवजड वाहतुकीच्या माजोरीवर घाव घातला. बुधवारी सकाळ पासूनच त्यांनी रस्त्यावर उतरून थेट कारवाई करत अनेक डंपर आणि ट्रक थांबवत चालकांना कायद्याचा स्पष्ट इशारा दिला – “इथून पुढे नियमांबाहेर एकही चाक फिरणार नाही!”

लिंगाडे यांच्या धडक कारवाईने डंपर लॉबीला धक्का बसला असून, पहिल्याच दिवशी वाहनधारकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. बिनधास्त धावणारे ट्रक आणि डंपर अचानक गारठल्याचं चित्र पुणे-अहिल्यानगर रस्त्यांवर पाहायला मिळालं.

मात्र, स्थानिकांमध्ये या कारवाईबाबत संमिश्र भावना आहेत. कारण याआधीही अनेक अधिकाऱ्यांनी अशाच जोरात सुरुवात केली, पण काही दिवसांतच या मोहिमा थंडावल्या. त्यामुळेच “ लिंगाडे किती काळ थांबतात?” हा प्रश्न आता चर्चेचा विषय ठरतोय.

डंपर व्यवसाय हा केवळ इंधनावर नाही, तर ‘राजकीय संरक्षण’ आणि ‘खास सांठगाठ’ या गिअरवर चालतो, असा लोकांचा ठाम आरोप आहे. ‘पी.आर. घराणं’ आणि ‘एस.डब्ल्यू. गट’ ही दोन छुपी सूत्रधार मंडळी स्थानिकांमध्ये नावाजलेली आहेत. यांच्या शिवाय एकाही डंपरचं चाक फिरत नाही, असं स्थानिकांचं म्हणणं आहे.

लिंगाडे यांच्या या आक्रमक सुरुवातीमुळे प्रशासनात उत्सुकता तर आहेच, पण डंपर लॉबी आता कोणती चाल खेळते, याकडेही सगळ्यांचे लक्ष लागले आहे. कारण वाघोलीत ‘नियम वळवणं’ ही एक अंगवळणी पडलेली कला आहे.

“ब्रेकशिवाय गिअर कायम ठेवला, तरच बदल शक्य”, असं स्पष्ट मत अनेक जाणकार व्यक्त करत आहेत. अन्यथा ही कारवाई देखील ‘आरंभीचा उत्साह आणि शेवटी शून्य’ अशीच ठरू शकते.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें