ऑपरेशन सिंदूर’च्या यशाचा लोणीकंद परिसरात जल्लोषात उत्सव

लोणीकंद, ( ता.हवेली ) — पाकिस्तानातील अतिरेक्यांच्या तळांवर भारतीय सैन्याने केलेल्या यशस्वी कारवाईनंतर संपूर्ण देशभरात आनंद व्यक्त केला जात असताना, हवेली तालुक्यातील लोणीकंद व पेरणे गावांमध्येही ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी व नागरिकांनी समाज प्रबोधन केंद्र ते पेरणे फाटा या मार्गावर भव्य तिरंगा मोटारसायकल रॅली काढली. “भारत माता की जय”, “वंदे मातरम्”, “भारतीय सैन्य दलाचा विजय असो” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

रॅलीदरम्यान अनेक ठिकाणी पेढे वाटण्यात आले, तसेच फटाक्यांची आतिषबाजी करत नागरिकांनी आपल्या देशाच्या लष्कराच्या पराक्रमाचा आनंद व्यक्त केला. बुधवारी मध्यरात्री सुमारास भारतीय वैमानिक दलाने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले, या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये देशभक्तीचा अभूतपूर्व उत्साह दिसून आला.

या उत्सवात सामाजिक कार्यकर्ते आणि स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेचे संस्थापक उत्तम भोंडवे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. सर्वांनी एकमेकांना पेढे भरवले, फटाके फोडले व “भारत माता की जय”च्या घोषणांनी परिसर भारावून टाकला. अशा प्रकारे ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे देशप्रेमाचे तेज लोणीकंद परिसरातही अनुभवायला मिळाले.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें