राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा पुणे दौरा : विविध मान्यवरांना सदिच्छा भेटी, आढावा बैठक व स्नेहभोजन

 

पुणे, दि. ९ मे २०२५ — राज्याचे राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर यांचा आज पुणे शहर व जिल्ह्याचा नियोजित दौऱ्याची सुरुवात सकाळी ८.०० वाजता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेऊन होणार आहे

यानंतर त्यांनी सकाळी ८.१५ वाजता शनिवार पेठ येथील कै. गिरीष बापट यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची सदिच्छा भेट घेऊन तत्पूर्वी त्यांनी नारायण पेठ येथील कै. मुक्ताताई टिळक यांच्या निवासस्थानी भेट

सकाळी ९.१५ वाजता ज्येष्ठ भाजप नेते माधव भंडारी यांच्या प्रभात रोडवरील निवासस्थानी राखीव भेटीचे आयोजन करण्यात आले आहे.

यानंतर सकाळी १०.०० वाजता भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय, राज्यस्तरीय तसेच पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहर, पुणे ग्रामीण (उत्तर-दक्षिण) विभागातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी विविध विषयांवर बैठक, ही बैठक भाजप पुणे शहर कार्यालय, म्हात्रे पुलाजवळ, एरंडवणे येथे पार पडणार आहे

दुपारी १.०० वाजता पक्ष पदाधिकाऱ्यांसमवेत स्नेहभोजन त्यानंतर २.१५ वाजता शनिवार पेठेतील मोतीबाग येथे राखीव भेटीचे आयोजन आहे

दुपारी ३.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन असून यामध्ये राज्यमंत्री साकोरे बोर्डीकर यांनी संबंधित विभागप्रमुखांशी चर्चा करणार आहे

सायंकाळी ६.०० वाजता त्या फुलगाव, ता. हवेली येथील भानुदास शंकर साकोरे (मा. उपसरपंच) यांचे पुतणे ऋषिकेश यांच्या विवाह सोहळ्यास चौंधे फार्म, वढू खुर्द येथे उपस्थित राहणार आहे.

राज्यमंत्री साकोरे बोर्डीकर यांचा पुणे दौरा विविध भेटी, चर्चा व स्नेहसंवादाने भरलेला राहिला. या दौऱ्यात त्यांनी पक्षाच्या तसेच प्रशासकीय कामकाजाचा समतोल राखत कार्यक्षमतेचे दर्शन घडणार हे मात्र नक्की..!

 

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें