शिरूर येथे महावितरणच्या कार्यालयात चोरी – सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी कैद

शिरूर (प्रतिनिधी) – शिरूर येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयात अज्ञात चोरट्याने चोरी करून सुमारे ३२ हजार रुपयांचा माल लंपास केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना ४ मेच्या सायंकाळपासून ५ मेच्या मध्यरात्री दरम्यान घडली असून, याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी मानसिंग जगदीश नेवसे (वय ३५, रा. छत्रपती कॉलनी, शिरूर) यांनी फिर्याद दिली असून, अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय दंड संहिता BNS ३०३(२) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

 

फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, ४ मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजता महावितरणचे ऑफिस बंद करून कर्मचारी आपल्या घरी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी कार्यालय उघडले असता सहाय्यक अभियंता वैभव बारवकर यांच्या निदर्शनास आले की, कार्यालयाच्या बाहेर ठेवलेला अल्युनियम कंडक्टर व १२० एमएम केबल गायब आहे.

त्यानंतर तपासणी दरम्यान सीसीटीव्ही फुटेज पाहण्यात आले असता, ५ मे रोजी रात्री २.३० वाजता एक अनोळखी इसम मोटारसायकल घेऊन कार्यालयाच्या आवारात येत असल्याचे दिसले. त्याने अल्युनियम कंडक्टर व १२० एमएम केबल मोटारसायकलला बांधून पळवले. चोरट्याने सदर माल परवानगीशिवाय चोरून नेल्याचे स्पष्ट झाले.

चोरीस गेलेल्या मालामध्ये अंदाजे २८,००० रुपये किमतीचा अल्युनियम कंडक्टर आणि १२,००० रुपये किमतीच्या १२० एमएम केबलचा समावेश असून एकूण नुकसान ३२,००० रुपये इतके आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक राऊत आणि पोलीस नाईक खेडकर करीत आहेत.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें