वाजेवाडी : विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत पद्मावती माता युवा परिवर्तन पॅनलचे वर्चस्व, ग्रामदैवत पद्मावती माता सहकारी पॅनलची जोरदार टक्कर

वाजेवाडी (ता. शिरूर, जि. पुणे) – वाजेवाडी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित या प्रतिष्ठित संस्थेच्या पंचवार्षिक संचालक मंडळ निवडणुकीत पद्मावती माता युवा परिवर्तन पॅनलने आघाडी घेत १३ जागांपैकी ८ जागा पटकावल्या. तर ग्रामदैवत पद्मावती माता सहकारी पॅनलने ४ जागांवर विजय मिळवला. एक जागा बिनविरोध ठरली अश्या एकूण ५ जागेवर समाधान मानावे लागले.

यंदाच्या निवडणुकीत एकूण २२ उमेदवार रिंगणात उतरले होते. ५४४ मतदारांपैकी ५१३ मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी २८ मतदान बाद झाले, निवडणूक शांततेत पार पडली. निकालानंतर विजयी पॅनलकडून गावात उत्सुकतेचे वातावरण पाहायला मिळाले. विजयी उमेदवारांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला

ग्रामदैवत पद्मावती माता सहकारी पॅनलला ‘कपबशी’ निशाणी एकूण ५ जागांवर समाधान

ग्रामदैवत पद्मावती माता सहकारी पॅनलने १२ उमेदवार रिंगणात उतरवले होते. त्यापैकी नानासाहेब किसन वाजे, रंगनाथ मारुती वाजे, दत्तात्रय भिवाजी भोंडवे आणि महिला प्रतिनिधी म्हणून रूपाली श्रीकांत वाजे यांनी बाजी मारली. भटक्या विमुक्त जाती/जमाती प्रतिनिधी बाप्पूसाहेब बाबूराव गोसावी हे बिनविरोध विजयी झाले. तर अनिल तुळशीराम वाजे, मंडाजी विठ्ठल वाजे, गोविंद धर्मराज वाजे, अमित तान्हाजी सोनवणे, सचिन रोहिदास भोर, विनोद काळुराम तिखे, कमल प्रभाकर धनावडे व राहुल गोपाळ सोनवणे यांना पराभवाचा सामना करावा लागला.

 पद्मावती माता युवा परिवर्तन पॅनलला ‘रिक्षा’ निशाणी, ८ जागांवर विजयी

पद्मावती माता युवा परिवर्तन पॅनलचे दहा उमेदवार रिंगणात होते. त्यातील आठ उमेदवारांनी विजयश्री खेचून आणली. विठ्ठल दगडू चौधरी, योगेश बाळासाहेब वाजे, योगेश सर्जेराव वाजे, साहेबराव भागचंद वाजे, सत्यवान सोपान वाजे, अनुसूचित जाती/जमाती प्रतिनिधी मंगल मोहन तिखे, महिला प्रतिनिधी सीताबाई कचरू वाजे आणि इतर मागासवर्गीय प्रतिनिधी विनोद विठ्ठल चौधरी यांचा विजय निश्चित झाला.नवीन सत्यवान सोनवणे व सुरेखा संभाजी नवले यांना पराभव स्वीकारावा लागला.

मतदान प्रक्रिया संपल्यानंतर काही तासांत निवडणूक निर्णय अधिकारी पी. व्ही. हराळ यांनी अधिकृत निकाल जाहीर केला.

क्रॉस मतदानामुळे अनपेक्षित निकाल:

ग्रामदैवत पद्मावती माता सहकारी पॅनलचे प्रतिनिधी माजी उपसरपंच अमित सोनवणे यांनी माध्यमांशी बोलताना, “क्रॉस मतदान झाल्याने काहीसे अनपेक्षित निकाल लागले,” असे नमूद केले.

 नव्या चेहऱ्यांना मतदारांचा कौल; परिवर्तन पॅनलचा विजय

मतदारांनी नव्या चेहऱ्यांवर विश्वास दाखवत पद्मावती माता युवा परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांना निवडून दिले तसेच यशामध्ये पॅनलची बांधणी केलेल्या सर्व सहकार्यांचे मोठे योगदान लाभल्याचे माजी आदर्श सरपंच धर्मराज वाजे यांनी सांगितले.

या निवडणुकीकडे वाजेवाडी आणि परिसरातील सहकारी क्षेत्राचे विशेष लक्ष लागले होते. निकाल जाहीर झाल्यानंतर गावात मोठ्या प्रमाणात चर्चेचे वातावरण निर्माण झाले आहे.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें