लोकनेते प्रदिपदादा कंद यांच्या वाढदिवसानिमित्त लोणीकंद येथे भव्य २०-२० बैलगाडा शर्यतीचे आयोजन

लोणीकंद – राज्यातील पारंपरिक खेळांना चालना देण्यासाठी आणि ग्रामीण संस्कृती जपण्यासाठी, लोणीकंद येथील हिंदकेसरी बैलगाडा घाटावर भव्य २०-२० बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. हे आयोजन मा. अध्यक्ष पुणे जिल्हा परिषद व संचालक पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक प्रदिप विद्याधर कंद यांच्या वाढदिवसानिमित्त शिवाजीयन्स ग्रुप व समस्त ग्रामस्थ लोणीकंद यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.

या शर्यतीचा भव्य सोहळा गुरुवार, दिनांक ८ मे २०२५ रोजी पार पडणार असून, राज्यभरातील नामांकित बैलगाडा मालक व शौकिनांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळणार असल्याचे संकेत आयोजकांनी दिले आहेत.

भव्य बक्षिसे:-

प्रथम क्रमांक १,२१,००० द्वितीय १,००,००० ‘घाटाचा राजा’: ११,००० फळीफोड:११,०००, २ नं.फळीफोड : ७,०००, २० फुटांवरून बारी: ₹११,००० चे विशेष बक्षीस

आकर्षिक बक्षीसे:-

प्रथम: ९१,००० द्वितीय :७१,०००, तृतीय : ६१,०००, चौथा:५१००० पाचवा ४१०००सहावा३५००० सातवा३०,०००, आठवा २५,०००,नववा२१,०००, दहावा१५,०००, अकरा११,०००, बारा १०,०००, तेरा ९,०००, चौदा ७,०००,  पंधरा ५,०००

३ या वर्षाचे मानकरी:

१. रामशेठ गुलाब भाडळे (वाघोली)

२. पै. किरणशेठ संपत साकोरे (फुलगाव)

३. बाबासो चंदरराव दरेकर (सणसवाडी)

४. विशालशेठ नारायण बांगर (केसनंद)

५. गणेशशेठ संभाजी लोखंडे (मरकळ)

६. संतोषशेठ ज्ञानेश्वर मांडेकर (आंबेठाण)

७. राजाराम मारुती साकोरे (फुलगाव)

८. शिवराज नारायण आव्हाळे (आव्हाळवाडी)

९. विलासशेठ महादेव शेळके (माण, मुळशी)

१०. विनायकआबा मोरे (चिखली)

११. रामदास सोपान दरेकर (सणसवाडी)

१२. गणपत किसन खेडकर (रांजणगाव)

१३. सचिन वाल्मिक नवले (दावडी, खेड)

१४. गणेश पोपट पवार (आंबेगाव)

१५. हिंदकेसरी मोरा ग्रुप (नवलाख उंब्रे)

१६. सागरशेठ दिलीप गायकवाड (तळेगाव ढमढरे)

१७. रामनाथ शेठ विष्णू वारिंगे

राजवीर भागवत जुगलबंदी

१८. दशरथ ज्ञानोबा ठाकूर (सोळू)

१९. कांतीलाल रामभाऊ साकोरे (फुलगाव)

२०. पै. भीमसेन बबन दरेकर (सणसवाडी)

२१. संतोषशेठ बाळासाहेब कंद (लोणीकंद)

२२. शिवराजशेठ नारायण आव्हाळे (आव्हाळवाडी)

२३. संतोषशेठ भास्कर चौघुले

२४. सुखदेवतात्या ज्ञानोबा भुजबळ (तळेगाव ढमढेरे)

२५. पांडुरंगशेठ किसन काळे (गव्हाणवाडी)

२६. शौर्य सागरआप्पा दंडवते

श्लोक विनोदभैय्या कदम जुगलबंदी

एकूण बक्षिस रक्कम ७,२१,०००

शर्यतीतील खास वैशिष्ट्ये: शर्यतीचे संपूर्ण आयोजन महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार होणार असून, प्रेक्षकांसाठीही बक्षिसांची खास तरतूद आहे.

लकी टोकन नंबर बक्षीस : २१ नंबर  २१,०० व १२१ नंबर-११,०० रुपये, टोकन शुल्क: ₹ २००० गाडा जुंपल्यावर परत दिली जाणार आहे

 

संपर्क व ऑनलाइन सुविधा: नावनोंदणीसाठी संपर्क क्रमांक – ९७६७५५०७२, ७४४८०४७२००, ९६०४००००१७ फोनपे / गुगल पे नंबर: ९८२३५०००१९ / ९५५२८१०९०९

अनाऊंसर्स मंडळीतील रंगत या शर्यतीला खास रंगत आणणार आहेत सुप्रसिद्ध अनाऊंसर – माऊली पिंगळे, शिवाजी आढळराव, सागर साळुंके, बंटी पिंगळे

ग्रामीण परंपरेचा महोत्सव:ही शर्यत केवळ स्पर्धा नसून, ग्रामीण परंपरा, एकोप्याची भावना आणि सामाजिक एकात्मतेचा उत्सव ठरणार आहे. परंपरा आणि आधुनिकतेचा संगम असलेली ही शर्यत गावकऱ्यांच्या उत्साहात भर घालणार आहे, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

 

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें