लोणीकंदच्या यशाचा डंका आता परराज्यातही – उत्तर प्रदेशातील मान्यवरांचा अभूतपूर्व अभ्यासदौरा

लोणीकंद शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा अधिकच तेजस्वी!

पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील पी.एम.श्री. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, लोणीकंद ही शिक्षण क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारी शाळा, आता महाराष्ट्राच्या बाहेरही आपल्या नावाचा झेंडा फडकावत आहे. नवोपक्रमशील शिक्षक, शाळेप्रेमी पालक, समाजहितद्रष्टा ग्रामस्थ यांचा अभूतपूर्व समन्वय या यशामागील मूळ कारण असून, याचं सर्वश्रुत उदाहरण म्हणजे नुकताच पार पडलेला उत्तर प्रदेशातील मान्यवरांचा अभ्यासदौरा.

२१ एप्रिल २०२५ रोजी, सोमवार, उत्तर प्रदेश राज्यातील काही सीईओ आणि २५ निवडक जिल्ह्यांतील सरपंच यांचा शिष्टमंडळ लोणीकंद गावाच्या अभ्यासदौऱ्यावर आले होते. ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामांची, पशुवैद्यकीय दवाखाना, फिल्टर प्लांट, बहुउद्देशीय इमारत, गायरान विकास वृक्ष लागवड प्रकल्प, आणि अर्थातच पी.एम.श्री. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी त्यांनी सखोल भेट दिली.

शाळेतील नवोन्मेषी उपक्रम, शैक्षणिक गुणवत्ता, सुसज्ज शाळा परिसर, तंत्रस्नेही विद्यार्थी, अभिमानास्पद विद्यार्थीसंख्या, आणि निसर्गरम्य वातावरण यांचा पाहुण्यांवर गहिरा प्रभाव पडला. शाळेची इमारत, इतिहास आणि यशोगाथा ऐकून ते भारावून गेले. विशेषत: विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या रोबोटिक्स प्रकल्पांनी त्यांना अचंबित केलं. त्यांनी विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षिसे देत त्यांचे मनोबल वाढवले. अधिक विशेष म्हणजे, शाळेचे विविध उपक्रमांचे व्हिडिओ आणि कामकाजाचे दस्तऐवज त्यांनी मागवून घेतले आणि त्यांच्या राज्यात अशाच प्रकारचे कार्य राबवण्याची ग्वाही दिली. तसेच, यापुढे पुन्हा या “आदर्श” लोणीकंद शाळेला भेट देण्याची तयारी देखील त्यांनी दर्शवली.

या अभिमानास्पद प्रसंगी गावचे शिल्पकार व आधारस्तंभ पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप विद्याधर कंद, सरपंच मोनिका कंद, माजी सरपंच श्रीकांत कंद, ग्रामपंचायत सदस्य व इतर मान्यवर उपस्थित होते. केंद्रप्रमुख शांता इचके मॅडम, मुख्याध्यापिका जयश्री अनुसे, सर्व शिक्षकवृंद, महिला बचत गटाच्या सदस्या, व इतर कर्मचारी यांनी उत्तम आयोजन केले. शाळेचे कार्यतत्पर शिक्षक मा. एकनाथ शिंदे सर यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक व यशोगाथा सादर केली, तर सरपंच मोनिका कंद यांनी कार्यक्रमाचे आभार मानले. हा दौरा लोणीकंद गावाच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाची साक्ष देणारा असून, गावाची ओळख आता केवळ जिल्ह्यात मर्यादित न राहता राष्ट्रीय स्तरावर नोंदली जात आहे.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें