तुळापुरात भरधाव कारची चिमुकल्याला धडक – दुर्दैवी मृत्यू

लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत तुळापुर, ता. हवेली येथील आळंदी रोडवर (दि.१८ एप्रिल २०२५ रोजी) दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान एक हृदयद्रावक घटना घडली, शिवांक हॉटेलसमोर रस्त्यावरून जात असलेल्या सात वर्षांच्या बालकास एका भरधाव कारचालकाने जोरात धडक दिली. या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या मुलाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला.

या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली असून, मुलाचा वडील संतोष दाभाडे (वय ३८, रा. तुळापुर, ता. हवेली, जि. पुणे) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी कारचालकाविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम १०६ व २८१ अन्वये गुन्हा (गु.र.नं. १९७/२०२५) दाखल केला आहे. संबंधित चालकाने निष्काळजीपणे आणि भरधाव वेगात कार चालवल्याने अपघात झाला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास लोणीकंद पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक चव्हाण करत आहेत. या दुर्घटनेमुळे नागरीकांमध्ये तीव्र नाराजी असून, अशा बेदर कार चालकांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें