प्रतिनिधी, (शिरूर)
शिरूर तालुक्यात मांडवगण ते कोळगाव दरम्यान सध्या एक वेगळाच इतिहास घडतोय — कारण येथे रस्त्याचं काम केवळ सुरू नाही, तर ऑस्ट्रेलियन टेक्नोलॉजीने दर्जा आणि टिकाव यांचा नवा मानदंड तयार होतोय.या कामाची माहिती दिली अण्णा चव्हाण यांनी दिली, हा रस्ता सध्या गावकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे—कारण हा रस्ता केवळ बांधला जात नाही, तर दर्जेदार पद्धतीने साकारला जात आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, कामातील बारकावे आणि प्रत्येक टप्प्यावरची काटेकोर देखरेख यामुळे या रस्त्याचं काम वेगळं ठरतंय.
या कामामागे आहेत अनुभवी कंत्राटदार अशोक ढमढेरे, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प झपाट्याने आणि उत्तम गुणवत्तेसह पूर्ण होत आहे. त्यांचा कटाक्ष केवळ वेगावर नाही, तर रस्त्याच्या टिकावू आणि दर्जावरही आहे.
गावकरीही आनंदी आहेत. एकाने तर बोलून दाखवलं — हा रस्ता केवळ दोन गावांना जोडणारा नसून, प्रगतीकडे जाणारा मार्ग ठरणार आहे—अशा शब्दात स्थानिकांनी समाधान व्यक्त केलं आहे.