वाजेवाडी सोसायटी निवडणूक: संचालक पदांसाठी रंगतदार लढत; २७ एप्रिल रोजी मतदान

वाजेवाडी सहकारी निवडणुकीत- ‘कपबशी’ विरुद्ध ‘रिक्षा’ आमने सामने

वाजेवाडी (ता. शिरूर, जि. पुणे) – वाजेवाडी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित या प्रतिष्ठित संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत यंदा राजकीय आणि सामाजिक समीकरणांनी रंगतदार वळण घेतले आहे. २७ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानात दोन पॅनेल आमनेसामने येत असून, स्थानिक राजकारणात मोठा रस निर्माण झाला आहे.

एकूण १३ जागांसाठी ४५ अर्ज दाखल झाले होते. छाननीदरम्यान एक अर्ज बाद झाल्यानंतर ४४ अर्ज वैध ठरले. मात्र, अर्ज माघारीच्या दिवशी २२ उमेदवारांनी माघार घेतल्याने केवळ १२ जागांसाठी २२ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. विशेष म्हणजे, भटक्या विमुक्त जाती/जमाती प्रवर्गातील बाप्पूसाहेब बाबूराव गोसावी हे बिनविरोध निवडून आले आहेत.

ग्रामदैवत पद्मावती माता सहकारी पॅनल’ विरुद्ध ‘पद्मावती माता युवा परिवर्तन पॅनल’

या निवडणुकीत ग्रामदैवत पद्मावती माता सहकारी पॅनल (चिन्ह – कपबशी) व पद्मावती माता युवा परिवर्तन पॅनल (चिन्ह – रिक्षा) यांच्यात थेट लढत पाहायला मिळणार आहे. अनुभवी व नवोदित चेहऱ्यांचा संगम असलेल्या या लढतीत गावातील सहकार क्षेत्राचे भवितव्य ठरणार आहे.

उमेदवारांची रचना खालीलप्रमाणे:

ग्रामदैवत पद्मावती माता सहकारी पॅनल (१२ उमेदवार)

सर्वसाधारण: नानासाहेब किसन वाजे, अनिल तुळशीराम वाजे, मंडाजी विठ्ठल वाजे, रंगनाथ मारुती वाजे, दत्तात्रय भिवाजी भोंडवे, गोविंद धर्मराज वाजे, अमित तान्हाजी सोनवणे, सचिन रोहिदास भोर

अनुसूचित जाती: विनोद काळुराम तिखे

महिला: कमल प्रभाकर धनावडे, रूपाली श्रीकांत वाजे इतर मागासवर्गीय: राहुल गोपाळ सोनवणे

पद्मावती माता युवा परिवर्तन पॅनल (१० उमेदवार)

सर्वसाधारण: योगेश बाळासाहेब वाजे, योगेश सर्जेराव वाजे, साहेबराव भागचंद वाजे, नवीन सत्यवान सोनवणे, सत्यवान सोपान वाजे, विठ्ठल दगडू चौधरी अनुसूचित जाती: मंगल मोहन तिखे

महिला: सीताबाई कचरू वाजे, सुरेखा संभाजी नवले इतर मागासवर्गीय: विनोद विठ्ठल चौधरी

मतदान आणि निकाल प्रक्रिया:

१७ एप्रिल रोजी उमेदवारांना अधिकृत निवडणूक चिन्हे वाटप करण्यात आली असून, मतदान २७ एप्रिल रोजी सकाळी ९ ते ५ दरम्यान जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वाजेवाडी येथे होणार आहे. विशेष म्हणजे, मतदानानंतर केवळ अर्ध्या तासात निकाल जाहीर केला जाणार आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी पी. व्ही. हराळ यांनी स्पष्ट केले आहे.

या निवडणुकीकडे संपूर्ण वाजेवाडी गावासह आजूबाजूच्या परिसरातील सहकारी संस्थांच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. अनुभवी आणि नवोदित उमेदवारांच्या चुरशीच्या लढतीत कोण बाजी मारेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

 

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें