भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती, उत्सव मोठया उत्साहात साजरी करण्यात येणार

१३४ व्या जयंतीनिमित्त १३४ झाडे लावण्याचा सिद्धार्थ तरुण मंडळाचा अनोखा संकल्प..

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती, निमित्ताने देशभरातून तसेच राज्यभरातही विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांना अभिवादन केलं जाणार आहे, येत्या १४ एप्रिल २५ रोजी, लोणीकंद ग्रामस्थ व सिद्धार्थ तरुण मंडळाच्या वतीने, प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत भारतरत्न, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात येणार असल्याची माहिती लोणीकंद ग्रामपंचायत सदस्य, आशिष गायकवाड यांनी दिली.

दि.१३ एप्रिल २५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ वी जयंती निमित्ताने१३४ वृक्षांचे लोणीकंद गायरान जमिनीवर वृक्षारोपणाचा अनोखा उपक्रम राबवण्याचा निर्धार सिद्धार्थ तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे, यामध्ये विविध प्रकारची औषधी वनस्पती, फुलझाडे, फळझाडे आदी वृक्ष लावण्यात येणार आहे,

१४ एप्रिल रोजी सकाळी ६ ते ९ वाजण्याच्या दरम्यान पेरणे फाटा येथील जयस्तंभ ते लोणीकंद भीमज्योत आणण्यात येणार आहे, सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत अक्षय ब्लड सेंटर, हडपसर डॉ. प्रणव भिलारे व अक्षय सोनवणे यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, जयस्तंभ पेरणे फाटा येथून आलेल्या भीमज्योतीचे ग्रामस्थांच्या वतीने मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात येणार आहे व नंतर भगवान गौतम बुद्ध यांना वंदन व अभिवादन सभा व सर्व मान्यवरांच्या उपस्थिती मानवंदना देण्यात येणार असून सायंकाळी सात वाजता महामानव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून लोणीकंद गावातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून तरी महामानवाला अभिवादन करण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन लोणीकंद गावचे माजी सरपंच सागर गायकवाड यांनी केले आहे.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें